शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या गेटमध्ये बिघाड, रब्बी पीके लागली सुकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:05 IST

बनोटी लघु प्रकल्पातून बनोटी, वाडी, पळशी, वरठाण व मुखेड शिवारातील पिकांना तीन आवर्तने दिली जातात. मात्र, बनोटी कालव्याच्या गेटचा ...

बनोटी लघु प्रकल्पातून बनोटी, वाडी, पळशी, वरठाण व मुखेड शिवारातील पिकांना तीन आवर्तने दिली जातात. मात्र, बनोटी कालव्याच्या गेटचा कनेक्टेड रॉड तुटल्याने गेट खुले झाले नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने कालव्यात पाणी सोडले जात नसल्याने पाटातील पाणी शेतापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे रब्बी पिकांना पुरेसे पाणी मि‌ळत नसल्याने रब्बी पिकेही माना टाकू लागली आहेत.

१५ डिसेंबर रोेजी पहिले आवर्तन सोडले जाणार असल्याने पाणीपट्टी वसुली करण्यात आली. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रब्बी हंगामाची तयारी करीत रब्बीचा पेरा केला. त्यानंतर पाणी सोडण्यासाठी प्रकल्प अधिकारी गेट उघडण्यासाठी गेले. मात्र कालव्याच्या गेटचा कनेक्टेड राॅड तुटल्याने मोठी अडचण निर्माण झाली. औरंगाबाद येथून कारागीर मागविण्यात आला. त्याने गेट उघडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तिथेही अडचण आल्याने अखेर ते काम अर्धवटच सोडण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे विभागाचा निष्काळजीपणा आमच्या माथी येऊन पडला आहे. त्यामुळे आमचे नुकसान होऊ लागल्याची भावना शेतकरी शेषराव जाधव यांनी मांडली.

फोटो कॅप्शन : बनाेटी शिवारात पाण्याअभावी कोमेजलेले मका पीक