शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारदान्याअभावी तूर खरेदीला लागतोय ‘ब्रेक’ !

By admin | Updated: March 3, 2017 01:34 IST

कळंब : तालुक्यात दहा वर्षानंतर तुरीचे पीक बहरले असले तरी या तुरीला बाजारात कोणी विचारत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले

कळंब : तालुक्यात दहा वर्षानंतर तुरीचे पीक बहरले असले तरी या तुरीला बाजारात कोणी विचारत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले असून, तालुक्यात तुरीचे केवळ दोन शासकीय खरेदी केंद्रे सुरू असून या केंद्रांवरील खरेदीस बारदान्याच्या तुटवड्यामुळे वारंवार ब्रेक लागत आहे. यामुळे खुल्या बाजारात कोणी घेइना अन् शासकीय खरेदी केंद्रावर मेळ लागेना अशी विचित्र कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे.कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा प्रमुख हंगाम आहे. या हंगामातील तूर हे प्रमुख पीक आहे. तालुक्यात खरीप हंगाम २०१६ मध्ये जवळपास ८ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. यावर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने व हवामान अनुकूल असल्याने पीक बऱ्यापैकी बहरले होते. यामुळे दहा वर्षात प्रथमच कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पन्नाचा हातभार लागला असल्याने आनंद व्यक्त झाला होता. कळंब तालुक्यातील व लगतच्या वाशी, केज तालुक्यातीलही असंख्य शेतकरी आपल्या तूर विक्रीस कळंब येथील कृषी बाजारास प्रथम प्राधान्य देतात. यानुसार यंदा बहुंताश शेतकऱ्यांचा या मार्केटला तूर घालण्यावर भर होता. यातच कळंब शहरात २ व ग्रामीण भागात ५ अशी तालुक्यात ७ शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू होऊन या ठिकाणी प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये दराने खरेदी सुरू झाली. कळंब बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदी केंद्रावर माल घालण्यावर भर होता. यानुसार शासकीय खरेदी केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. सर्व काही सुरळीत होत आहे असे चित्र दिसत असतानाच या ७ केंद्रांपैकी शेतकऱ्यांच्या कंपन्यानी सुरू केलेली इटकूर, खामसवाडी, गौर या पाच ठिकाणचे केंद्रे अचानक बंद पडली. याशिवाय चालू असलेल्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या व खामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केंद्राला बारदान्याचा तुटवडा ही समस्या जाणवू लागली. यामुळे खुल्या बाजारात कोणी विकत घेइना अन् शासकीय केंद्रावर मेळ लागेना, अशी विदारक स्थिती सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे.(वार्ताहर)