शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:29 IST

दीनदयाळ कॉलनीतील एका शिक्षकाच्या दाराच्या कोंड्यावर टॉवेल गुंडाळून कोंडा तोडत चोरट्यांनी कपाटामधील ८ तोळयांचे दागिने व नगदी ८० हजार रु पये लंपास करून पोबारा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई :गेल्या महिनाभरापासून अंबाजोगाई शहरामध्ये चोºयांचे सत्र सुरूच असून यापैकी एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणेला लावता आलेला नाही. गुरूवारी दिवसाढवळ्या दीनदयाळ कॉलनीतील एका शिक्षकाच्या दाराच्या कोंड्यावर टॉवेल गुंडाळून कोंडा तोडत चोरट्यांनी कपाटामधील ८ तोळयांचे दागिने व नगदी ८० हजार रु पये लंपास करून पोबारा केला. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.परळी येथील माध्यमिक शिक्षक दीपक त्रिंबक अप्पा नावंदे हे अंबाजोगाई येथील दीनदयाळ कॉलनीत अजय पांडे यांच्या घरी किरायाने राहतात. गुरूवारी सकाळी मित्रांसोबत नावंदे हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला गेले होते. घरी लहान मूल असल्याने पत्नी व मुलगा घरी थांबले होते. १० वाजेच्या सुमारास लहान बाळाला ताप आल्याने सदरील महिलेने घराला कुलूप लावून बाळाला रूग्णालयात नेले. घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा आणि कुलूप टॉवेलने गुंडाळून तोडून टेबलवर ठेवला आणि आत प्रवेश केला. कपाटामधील ४ तोळ्याचे गंठन, ५ ग्रामचे लहान मुलाचे लॉकेट, ६ ग्रामच्या अंगठ्या, कानातले ५ ग्रामचे फुले व नगदी ८० हजार रु पये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. १ वाजता सदरील महिला घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत शेजारील काम सुरु असलेल्या मजुरांना विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. या चोरीमध्ये अंदाजे अडीच लाख रूपयंचा ऐवज लंपास झाला आहे. बीडच्या श्वानपथकाला पाचारण केले आहे. घराशेजारील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे नजरकैद झालेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. शहरात रात्रीच्या व सकाळच्या चोºया नित्याचे बनले असताना गुरूवारी दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाल्याने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.