शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सी.ए.च्या पदवीला ब्रँड व्हॅल्यू

By admin | Updated: June 29, 2015 00:33 IST

औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडियाचा सी.ए. अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय निकषावर सिद्ध झाला आहे. यामुळेच सीएची पदवी ब्रँड व्हॅल्यू बनली आहे.

औरंगाबाद : दी इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस् आॅफ इंडियाचा सी.ए. अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय निकषावर सिद्ध झाला आहे. यामुळेच सीएची पदवी ब्रँड व्हॅल्यू बनली आहे. परिणामी याला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळाली आहे. दृढइच्छाशक्ती, कठोर मेहनत व सदैव सकारात्मक विचारांच्या जोरावरच विद्यार्थी सी.ए. बनू शकतो, असे मौल्यवान मार्गदर्शन आयसीएआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप शहा यांनी केले. लोकमत आणि ‘आय.सी.ए.आय’च्या औरंगाबाद शाखेच्या वतीने ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ क्षेत्रात करिअर व संधी’ या विषयावर आयोजित शिबिरात ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे सहप्रायोजक आर.जे.फाऊंडेशन हे होते. रविवारी सायंकाळी लोकमत भवन येथील शिबिराला सी.ए. होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी हॉल भरून गेला होता. हॉल अपुरा पडल्याने शेजारील हॉलमध्येही बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे स्क्रीनवर कार्यक्रम दाखविण्यात येत होता. व्यासपीठावर आयसीएआयच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सी.ए पंकज कलंत्री, आर.जे. फाऊंडेशनचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला व सहउपाध्यक्ष संदीप बिष्णोई यांची प्रमुख उपस्थिती होती. जयदीप शहा म्हणाले की, करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर बहुपर्याय उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय या क्षेत्रात उत्तम करिअर घडू शकते. तसेच चार्टर्ड अकाऊंटंट झाल्यावरही तेवढेच उत्तम करिअर बनू शकते. १२ वी नंतर पुढील पाच ते सहा वर्षात व्यावसायिक शिक्षणाचे जे ज्ञान प्राप्त केले, त्याचा प्रभाव पुढील ४० ते ४५ वर्षाच्या करिअरवर पडू शकतो. याचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाका. करिअर निवडताना बहुपर्याय, आपले आवडीचे क्षेत्र व भविष्यातील संधीचा आवश्यक विचार करावा. सीए बनण्यासाठी सीपीटी, आयपीसीसी व सी.ए. अंतिम अशा तीन परीक्षा द्याव्या लागतात. कॅनडा, आॅस्ट्रेलिया, आयर्लंड, इंग्लंड यासारख्या देशांशी आयसीएआयने सामंजस्य करार केल्याने भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातही सीए होण्याचे स्वप्नपूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सीएची परीक्षा देताना शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सही मिळते. या कोर्सची फीस इतर व्यावसायिक शिक्षणापेक्षा कमी असते. यामुळे मध्यमवर्गीयांतील गुणवंत विद्यार्थ्यांनाही सीए होता येते. तसेच आर्टिकलशिप दरम्यान विद्यावेतनही मिळते, अशी माहिती त्यांनी दिली. इंजिनिअरिंग, मेडिकलसोबतच विद्यार्थ्यांचा कल कॉमर्सकडे वाढल्याचे राघवेंद्र जोशी यांनी सांगितले. शेवटी ओमप्रकाश केला यांनी पालकांच्या वतीने शहा यांना प्रश्न विचारले. यानंतर काही पालकांनी व विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या. त्यास शहा यांनी सविस्तर उत्तरे दिली. संचालन गणेश तरटे यांनी केले.