शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘दानवे हटाव’वर आज मंथन

By admin | Updated: September 12, 2016 23:23 IST

ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.

औरंगाबाद : शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीला जाण्यासाठी सेनेतील दोन्ही गट सोमवारी मुंबईला रवाना झाले. आ. शिरसाट यांच्यासह जैस्वाल, माने, त्रिवेदी यांनी दानवे यांच्यावर पक्ष विक्रीचा आरोप केल्यानंतर पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असून, त्यांच्या आदेशाने खा.देसाई हे बैठक घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे परदेशातून येईपर्यंत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाकरे आल्यानंतर पुन्हा याप्रकरणी बैठक होणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे, खा.देसाई, आ.शिरसाट, दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी आ.जैस्वाल, माने, त्रिवेदी यांची बैठकीला उपस्थिती असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाद शांत करावा लागेल. हे प्रकरण पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. ठाकरे दौऱ्यावरून परत येईपर्यंत सर्वांना थोपवावे लागेल. त्यांनी खा.देसाई यांना मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. घोसाळकर आणि खा.खैरे यांची भूमिका बॅलन्स आहे. सकारात्मक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पक्षात कुणीही ‘अमरपट्टा’ बांधून आलेले नाही. त्यामुळे बैठकीत योग्य तोच निर्णय होईल. नेतृत्वाने नि:पक्षपाती काम केले पाहिजे. ते होत नसल्यामुळे भविष्यात कधी तरी होणारा गदारोळ आताच झाला आहे. यामध्ये दोष कुणालाही द्यायचा नाही. पक्षाच्या मुळावर जर कुणी घाव घालत असेल तर पक्ष गप्प बसणार नाही.