शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मोत्सवात भगवंतांचा विवाहोत्सव थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:04 IST

येथील पुरातन बालाजी मंदिरात सुरु असलल्या ब्रह्मोत्सवात काढण्यात येणा-या उत्सव शोभायात्रेत भाविकांची गर्दी वाढत असून सहा दिवस चालणारा हा उत्सव शहरवासियांसाठी भक्तीची पर्वणी असतो.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील पुरातन बालाजी मंदिरात सुरु असलल्या ब्रह्मोत्सवात काढण्यात येणा-या उत्सव शोभायात्रेत भाविकांची गर्दी वाढत असून सहा दिवस चालणारा हा उत्सव शहरवासियांसाठी भक्तीची पर्वणी असतो. तिरुपती तिरुमला बालाजीप्रमाणेच येथे होणारा ब्रह्मोत्सव शहराचा वैभव वाढविणारा आहे. दाक्षिणात्य छाप असलीतरी महाराष्टÑाच्या संस्कृतीशी नाळ जुळवित होत असलेला हा उत्सव पेठबीड भागासाठी जणू दुसरी दिवाळीच असते.ब्रह्मोत्सवाचे हे तेरावे वर्ष असून यशस्वी आयोजनामध्ये विविध समित्यांचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. बुधवारी पुण्याह वाचन, अंकुर अर्पणम् विधीने देवदेवतांना आवाहन करुन गुरुवारी हवनपूजा आणि ध्वजारोहणम् सोहळ्याने ब्रह्मोत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी कलश स्थापनेनंतर शेष वाहन शोभायात्रा काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी हंस वाहन आणि रात्री गरुड वाहन शोभायात्रा काढण्यात आली. शनिवारी सकाळी हनुमंत वाहन शोभायात्रा काढण्यात आली. ब्रह्मोत्सवातील महत्वाचा कल्याण उत्सव सोहळा सायंकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.दरम्यान, रविवारी रथोत्सव शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे हिरालाल सारडा, अ‍ॅड. ओमप्रकाश जाजू, अ‍ॅड. डॉ. सत्यनारायण कलंत्री, अमृत सारडा, राजेंद्र बनसोडे, द्वारकादास मुंदडा, लक्ष्मण शेनकुडे, मिलिंद महाजन, सुशील खटोड, नरेंद्र सारडा आदींनी केले आहे.