शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

..अन् ब्राह्मणवाडीची शाळा बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:46 IST

नशेखोर शिक्षकाची बदली करण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने पालक आणि गावकºयांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवल्याने प्राथमिक शाळाच बंद पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नशेखोर शिक्षकाची बदली करण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने पालक आणि गावकºयांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवल्याने प्राथमिक शाळाच बंद पडली आहे. तालुक्यातील ब्राह्मणवाडी गावात असा प्रकार घडल्याने बालकांच्या प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत हक्कांवर गदा आली आहे.तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते ग्रामस्थ आणि पालकांशी अरेरावी करतात. शाळेत नशा करून येतात, अशा गावकºयांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे तशा तक्र ारी वेळोवेळी केल्या आहेत; मात्र शिक्षण विभागाने त्याची काहीही दखल घेतली नाही. शेवटी वैतागून पालक आणि ग्रामस्थांनी मुलांना मंझरी, डिघोळ, चौसाळा येथील शाळेत पाठवले. आजघडीस शाळेत एकही विद्यार्थी नाही .शाळा बंद पाडणाºया बेजबाबदार शिक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनावर हरिदास राजगुरु , ठकसेन खाडे, त्रिंबक पौळ, राम घोगरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.