शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलधारकांना साखर ‘कडू’...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 00:16 IST

जालना : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन दुकानात अंत्योदय व बीपीएल धारकांना मिळणाऱ्या साखरेच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन दुकानात अंत्योदय व बीपीएल धारकांना मिळणाऱ्या साखरेच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पंधरा रुपये प्रतीकिलो दराने मिळणारी साखर आता वीस रुपये प्रतीकिलोने मिळणार आहे. राज्यात जूनपासून लागू करण्यात आलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार २१७ लाभार्थ्यांना स्वत धान्य दुकानात सारख खरेदीचा कडू अनुभव येत आहे.अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली रेशन अन्नधान्याचे वितरण केले जाते. स्थानिक स्तरावर जिल्हा पुरवठा विभागामार्फत रास्त भाव दुकानदार हे काम करतात. जिल्ह्यात एक हजार २७८ रेशन दुकानातून शासनाकडून अनुदानावर मिळणारे गहू, तांदूळ, सण-उत्सावात मिळणारे तेल, साखर याचे वितरण केले जाते. विशेष प्रसंगी गरिबांना अल्प किमतीत साखर उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने २०१४ पासून खुल्या बाजारातून साखर खरेदी करून प्रतीव्यक्ती पाचशे ग्रॅमप्रमाणे साखरचे वाटप सुरू केले. यासाठी केंद्र शासनाकडून साखरेवर प्रतीकिलो १८ रुपये ५० पैसे अनुदान दिले जाते. मात्र, रेशन साखर वितरण प्रणालित केंद्रशासनाने आता बदल केला आहे. त्यानुसार २४ मे २०१७ च्या निर्णयानुसार फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती कुटुंब एक किलो साखर वितरित करण्यात येणार आहे. राज्यशासनाने अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांना प्रती कुटुंब एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, साखर विक्रीचे दर पंधरा ऐवजी वीस रुपये प्रतीकिलो राहणार आहेत.