शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बीपी, शुगरचा वाढतोय धोका !

By admin | Updated: April 6, 2017 23:33 IST

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली, वाढती व्यसने, अपुरी झोप अशा एक ना अनेक कारणांनी उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेहसारख्या (शुगर) असंसर्गजन्य आजारांचा विळखा वाढताना दिसत आहे़

उस्मानाबाद : बदलती जीवनशैली, वाढती व्यसने, अपुरी झोप अशा एक ना अनेक कारणांनी उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेहसारख्या (शुगर) असंसर्गजन्य आजारांचा विळखा वाढताना दिसत आहे़ मागील वर्षभरात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या तपासणीमध्ये बी़पी़, शुगरचे तब्बल ९६५७ रुग्ण आढळून आले आहेत़ विशेषत: यामध्ये बीपीच्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची बाब समोर आली आहे़वयाची ३० ते ३५ वर्षे ओलांडलेल्या नागरिकांमध्ये आज बीपी या जीवघेण्या आजारासह शुगरचे प्रमाण आढळून येत आहे़ देशात मधुमेहाचे ६़२३ टक्के, बिपीचे प्रमाण १५़९ टक्के, ह्दयाच्या झटक्याचे प्रमाण ०़९ टक्के, आहे़ तर विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे देशात पाच लाख नागरिकांचा मृत्यू होतो़ बदलेली जीवन शैैली, धूम्रपान, असमतोल आहार, मानसिक तणाव आदी कारणांमुळे या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे़ या आजाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून सन २०१४ पासून असंसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे़ या कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह नागरिकांची तपासणी करून असंसर्गजन्य आजार असलेल्यांवर मोफत औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत़ सन २०१६-१७ मध्ये जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ९६५७ बीपी, शुगरचे रुग्ण आढळून आले आहेत़ या कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत १ लाख ४६ हजार १०६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे़ यात १८५१ पुरूषांना तर १५२७ महिलांना अशा एकूण ३३७८ जणांना मधुमेहाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ तर २१३८ पुरूषांना व २९७७ महिलांना अशा एकूण ५११५ जणांना बीपीची लागण झाल्याचे समोर आले आहे़ विशेषत: बीपी या आजाराची लागण होण्यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे़ तर बीपी आणि शुगरची लागण झालेल्यांची संख्या ११६४ आढळून आली आहे़ यात ५७१ पुरूषांसह ५९३ महिलांचा समावेश आहे़