औरंगाबाद : इयत्ता सातवीत शिकत असलेला समर्थनगरमधील १४ वर्षीय मुलगा पार्थ कडूचंद शेट्टे हा मित्राला पुस्तक देतो म्हणून गेला, परंतु तो उशिरापर्यंत घरी आला नाही. वडिलांनी सकाळी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. त्यामुळे पोलीस यंत्रणा जोरदारपणे कामाला लागली, तेव्हा दुपारी मुलाचा वडिलांना मुंबईहून सुखरूप असल्याचा फोन आला. पार्थ हा केम्ब्रिज शाळेत इयत्ता ७ वीत शिकतो. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तो समर्थनगरातच पुस्तक देण्यासाठी जातो म्हणून गेला; परंतु तो उशिरापर्यंत परत आलाच नाही. वडिलांनी नातेवाईक, मित्रांकडे शोध घेतला, तो कुठेही सापडला नाही, आपल्या मुलाचे कुणी तरी अपहरण केले आहे, असे त्यांना वाटले. त्यामुळे सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याचे पोलिसांनी संदेश पास केले, त्याचा शोध सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत होते.
मुलगा गेला मुंबईला अन् पित्याला वाटले अपहरण!
By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST