लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : श्वान म्हणजे पोलिसांची शान असल्याचे सांगत कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात श्वान पथकाची भूमिका महत्त्वाची आहे़ या श्वानाने दिलेला संकेत तपासी अधिकारी कितपत गांभीर्याने घेतो, यावर तपासाचे यश अवलंबून असते, असे मत निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष नवले यांनी व्यक्त केले़श्वान पथकांना प्रशिक्षित करणारे सुभाष नवले यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे़ त्यामुळे परभणी येथील श्वान पथकातील अधिकाºयांसाठी नवले यांचे प्रशिक्षण ३० आॅगस्ट रोजी पार पडले़ यावेळी बोलताना सुभाष नवले म्हणाले की, पोलीस दलातील प्रत्येक तपासामध्ये श्वानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे़ सर्वसाधारण गुन्ह्यांमध्ये तर श्वान तपासाचे काम करतोच; या शिवाय हरवलेल्या व्यक्ती, एखादी दुर्घटना घडली असेल तर त्या ठिकाणी मृत आणि जिवंत व्यक्तींचा शोध घेण्याचे कामही या श्वानाच्या माध्यमातून होते़ आम्ली पदार्थांच्या शोधकार्यातही श्वानाचा वापर केला जातो़ त्यामुळे पोलीस दलातील हा विभाग जास्तीत जास्त वाढला पाहिजे़ तपासकामांमध्ये श्वानांचा वापर अधिक गांभीर्याने आणि परिणामकारक झाला पाहिजे़ श्वान त्याचे काम परिणामकारक पद्धतीने करतो़ परंतु, तपासी अधिकºयांनी श्वानाने दाखविलेल्या मार्गावर तर्क बुद्धीच्या सहाय्याने तपासाची दिशा ठरविली पाहिजे़पोलीस दलातील हे श्वान निश्चित तपासाची दिशा दाखवितात़, असेही त्यांनी सांगितले़ मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये श्वानांच्या वापर वाढविण्यात आला आहे़त्यास आणखी चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) बाळासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आदींची उपस्थिती होती़ याच कार्यक्रमात श्वान कशा पद्धतीने तपास काम करतो, त्याला प्रशिक्षण कसे द्यायचे, या विषयीचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते़
तपासात श्वानाची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:34 IST