शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दोघींच्या नावे केली ७५ हजारांची मुदत ठेव

By admin | Updated: March 27, 2017 23:52 IST

उस्मानाबाद : अवयव दान करणाऱ्या शिवपार्थ कोळी या बालकाच्या कुटुंबातील दोन मुलींच्या नावे अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या जिल्हा शाखेने ७५ हजारांची दामदुप्पट मुदतठेव ठेवली आहे.

उस्मानाबाद : लहान वयात अवयव दान करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या येथील शिवपार्थ कोळी या बालकाच्या कुटुंबातील दोन मुलींच्या नावे अखिल भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या जिल्हा शाखेने ७५ हजारांची दामदुप्पट मुदतठेव ठेवली आहे. मोलमजुरी करणाऱ्या शिवशंकर कोळी यांचा मुलगा शिवपार्थ (वय १४) याचा महिनाभरापूर्वी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. यानंतर त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय शिवशंकर कोळी यांनी घेतला. याबाबत कुटुंबियांना माहिती देवून त्यांनी एकुलत्याएक मुलाचे सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयात अवयवदान केले. त्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने सोमवारी शाहूनगर येथील कोळी कुटूंबियांची भेट घेवून गौरी शिवशंकर कोळी (वय १४) व राधा शिवशंकर कोळी (वय ९) या दोघींच्या नावे प्रत्येकी ३७ हजार ५०० रूपयांचे मुदतठेव प्रमाणपत्र स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुनिता माने यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मनोज घोगरे, उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय खुने, डॉ. अभिजीत बागल, सहसचिव डॉ. मुकूंद माने यांच्यासह ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. सुधीर मुळे, डॉ. श्रीनिवास हंबीरे, डॉ. सचिन रामढवे, आदींची उपस्थिती होती.