शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 18, 2016 00:52 IST

जाफराबाद : भरधाव एस.टी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील साले व मेहुणा जागीच ठार झाले.

जाफराबाद : भरधाव एस.टी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील साले व मेहुणा जागीच ठार झाले. घटना ही चिखली मेहकर फाट्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. जाफराबाद तालुक्यातील रास्तळ व देऊळगाव राजा गावावर शोककळा पसरली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.रास्तळ (ता.जाफराबाद, जि. जालना) येथील विठ्ठल भगवान जाधव (२२) हा त्यांचे मेहुणे राजेंद्र गणेश शिंदे (३०, रा. देऊळगावराजा) यांच्यासोबत मेहकर फाट्यानजीकच्या आॅटोमोबाईलवर आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी दुचाकीने निघाले होते. चिखली ते देऊळगाव राजा मार्गावर मेहकर फाट्यापासून चिखलीकडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या औरंगाबाद ते खामगाव बस (एमएच-४०-एन-९६९८) ने दुचाकी (एमएच-२१-एके-२२५२) ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.मयताचा चुलतभाऊ शिवहरी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून बसचालकाला अटक केली आहे. मृत विठ्ठल जाधव हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. तसेच राजू शिंदेच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ व एक बहीण आहे. ऐन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडल्याने बहिणी भावांना मुकल्या असून, साला व मेहुण्याच्या मृत्यूने देऊळगावराजा व रास्तळ गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)