शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला जाणा-या दोघांना चिरडले : एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:02 IST

मॉर्निंग वॉकला जाणा-या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सोलापूर-धुळे मार्गावरील पळसवाडी गावाजवळ घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : मॉर्निंग वॉकला जाणा-या दोघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता सोलापूर-धुळे मार्गावरील पळसवाडी गावाजवळ घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.सोमीनाथ शहादू देवरे (५१, रा. पळसवाडी) असे अपघातातील मयताचे नाव आहे, तर उत्तम गंगाधर ठेंगडे (५६, रा. पळसवाडी) असे गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे. बांधकाम मिस्तरी असलेले देवरे व महावितरणचे लाईनमन ठेंगडे हे नेहमी सकाळी सोलापूर-धुळे मार्गावर मॉर्निंग वॉकला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ. बाबासाहेब थोरात, वाल्मीक कांबळे, हनुमंत सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, देवरे यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता पळसवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.अज्ञात वाहनाचा शोध सुरूनित्याप्रमाणे मंगळवारी हे दोघे मॉर्निंग वॉकला निघाले असता सकाळी ६.३० वाजता पाठीमागून येणारे अज्ञात वाहन दोघांना चिरडून सुसाट वेगाने निघून गेले. या दुर्घटनेत सोमीनाथ देवरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर उत्तम ठेंगडे गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.