मदतीसाठी रुग्णवाहिकेसह प्रशासनाकडूनही दिरंगाईतेरखेडा : भरधाव वेगातील कंटेनरने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले़ जखमींचे पाय अपघातात निकामी झाले असून, घटनेनंतर पोलिसांसह आरोग्य विभागाची रूग्णवाहिकाही उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने संताप व्यक्त होत आहे़ हा अपघात शनिवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळ घडला़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील ढाकणेवाडी येथील रमेश भिकू ढाकणे व त्यांच्यासोबत एक ६५ वर्षीय वृध्द इसम हे शनिवारी सकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़०९- ए़पी़८४६५) उस्मानाबादच्या दिशेने निघाले होते़ त्यांची दुचाकी तेरखेडा नजीकच्या पारधी वस्तीजवळ आली असता समोरून औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या कंटेनरने (क्ऱएच़आऱ६१- सी़८१२०) जोराची धडक दिली़ या भीषण अपघातात दुचाकीवरील रमेश ढाकणे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेला वयोवृध्द इसम गंभीर जखमी झाला़ अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभागाच्या रूग्णवाहिकेसह पोलीस प्रशासनाला माहिती दिली़ मात्र, दोन्ही विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रूग्णवाहिका घटनेनंतर जवळपास अर्धा तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या़ परिणामी यंत्रणा येईपर्यंत घटनास्थळी जखमीं पडून होते़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत येरमाळा पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती़ अपघातानंतर पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाची यंत्रणा उशिराने दाखल झाल्याने संताप व्यक्त होत होता़ (वार्ताहर)
अपघातात दोघांचे पाय निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 23:53 IST