परंडा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना भूम येथील विशेष न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, अटकेतील मुलीस लातूर येथील सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे़पोलिसांनी सांगितले की, पश्चिम मुंबई मनवेपाडा परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस बालाजी जगन्नाथ पाटुळे (राग़णेगाव ता़भूम), सचिन बळीराम हुंके (रा़साकत ता़परंडा) यांनी २० जुलै रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले़ यादरम्यान दादर ते कुर्डूवाडी रेल्वे प्रवासदारम्यान, गणेगाव शिवारात वांगी ते जवळा रस्त्यावरील शेतात वरील दोघांनी वारंवार तिच्यावर बलात्कार केला़ पीडित मुलीने सोमवारी परंडा पोलिस ठाण्यात महिला दक्षता समितीच्या सदस्या व महिला पोलिस नाईक यांच्यासमक्ष साक्ष दिल्यानंतर त्या जबाबावरून वरील दोघाविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अटकेतील आरोपींना मंगळवारी भूम येथील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ त्यावेळी त्यांना २८ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तर पीडित मुलीस लातूर येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे़ पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
बलात्कार प्रकरणी दोघे जण कोठडीत
By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST