शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी महिलेवर अत्याचार करणारा बॉस अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:34 IST

सहकारी महिलेला ब्लॅकमेल करून चार वर्षे अत्याचार करणा-या तत्कालीन बॉसला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सहकारी महिलेला ब्लॅकमेल करून चार वर्षे अत्याचार करणा-या तत्कालीन बॉसला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.मिलिंद बाबूलाल माळी (४६,रा. रघुवीरनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना जिन्सी पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका कंपनीच्या कार्यालयात आरोपी मानव संसाधन विभागात (एच.आर) तर पीडिता स्वागतकक्षात कार्यरत होती. सप्टेंबर २०१२ मध्ये महालक्ष्मीनिमित्त पत्नीने हळदी-कुंकवासाठी बोलावल्याची थाप मारून त्याने पीडितेला घरी बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्या घरी ना महालक्ष्मी होती ना त्याची पत्नी. तेथे तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. ती अर्धवट शुद्ध हरपलेल्या अवस्थेत जाताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तेव्हापासून डिसेंबर २०१६ पर्यंत आरोपीची पत्नी घरी नसताना तो तिला धमकावून घरी बोलावून घेत आणि अत्याचार करीत. या कालावधीत त्याने तिचे अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ही छायाचित्र पीडितेच्या पतीला दाखवेल आणि इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची धमकी देत तो तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत. त्याच्या या त्रासातून मुक्तता करण्यासाठी पीडितेने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि अनेकदा मोबाइलनंबरही बदलले. मात्र, तो तिच्या नवीन नोकरीच्या ठिकाणी जात आणि तिचा मोबाइलनंबर मिळवून तिला संसार मोडण्याची धमकी देत. पीडितेची ड्यूटी संपण्याच्या वेळी तो कार घेऊन रस्त्यावर येऊन उभा राहत. तिला बळजबरीने कारमध्ये बसवून घेऊन जात. त्याचा त्रास थांबत नसल्याने शेवटी तिने पतीला विश्वासात घेऊन झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. पतीने तिला धीर देत याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे सांगितले. २८ आॅक्टोबर रोजी जिन्सी पोलिसांनी आरोपी माळीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी दिली.