शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्यिकांचा ‘ग्रंथ’ हेच अमूल्य ठेवा- लोमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:04 IST

प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले. यावेळी टॉर्च ही कविताही लोमटे यांनी सादर केली. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.हिंगोली न. प. कल्याण मंडपम् येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी लोमटे बोलत होते. जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बघाटे, ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती. लोमटे म्हणाले, वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात कळतात. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. ज्या देशांनी संस्कृतींनी ग्रंथांचे, ज्ञानाचे महत्त्व ओळखले त्या देशांची भरभराट झाली. त्या देशांचा, त्या भागाचा विकास संतुलित पद्धतीने झाल्याचे आपणांस दिसून येते. ग्रंथ वाचनाने आपण सतत समृद्ध होत असतो. पुस्तकामुळे बाहेरील नवीन जगाची ओळख होते. या ग्रंथामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. वाचन ही एकच अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो.प्रदर्शनाचे उद्घाटन- ग्रंथोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती.