शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

आडूळ परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:02 IST

अंकुश वाघ आडूळ : परिसरात शासकीय आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जात ...

अंकुश वाघ

आडूळ : परिसरात शासकीय आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी पैठण तालुक्यातील आडूळ, आंतरवाली खांडी, रजापूर, घारेगाव, एकतुनी, दाभरूळ, ब्राह्मणगाव, खादगाव, पारुंडी, गेवराई बु. या गावांमध्ये बस्तान मांडले असून गरीब, अशिक्षित नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. तर यासंदर्भात आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे फावत चालले आहे. वैद्यकीय शिक्षणाची नोंदणी अथवा परवाना नसतानासुद्धा बंगाली डॉक्टरांकडून सर्रासपणे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. थंडी तापाचा रुग्ण असल्यास त्याला आरामही पडतो. मात्र गंभीर आजाराचा रुग्ण असल्यास हे डॉक्टर पुढील उपचारासाठी पाठवून देतात. हा व्यवसाय करताना अंगलट येण्यासारखे काही प्रकरण घडल्यास ते बाहेरच्या बाहेर मिटविले जाते. यासाठी बोगस डॉक्टरांकडून स्थानिक पातळीवर राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र, कोणतीच कार्यवाही होत नसल्याने बोगस बंगाली डॉक्टरांचे दवाखाने खेड्यापाड्यात बिनबोभाटपणे सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाची लक्षणे असलेले नागरिक भीतीपोटी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल न होता बोगस बंगाली डॉक्टरांकडून सध्या उपचार घेत आहेत. काही डॉक्टर तर मोठी रिस्क घेऊन घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले. मात्र यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. समिती नावालाच आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाते. काही ठिकाणी जिल्ह्यात कारवाई झाली. मात्र, ती कारवाई ठोसपणे होत नसल्याने पुन्हा डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्रात आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. बंगाली बोगस डॉक्टर मद्यपान करून रुग्णांवर उपचार करीत असल्याने रुग्णाच्या जीवाशी ते खेळ घालीत आहेत. - शेख शौकत, आडूळ, ग्रामस्थ. हा अतिशय गंभीर प्रकार असून तपासणी पथक पाठवून आडूळ परिसरातील बोगस डॉक्टरांवर निश्चित कडक कारवाई केली जाईल. - डॉ सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी फोटो : आडूळ परिसरात बोगस बंगाली डॉक्टरांचे असे गावात ठिकठिकाणी दवाखाने थाटले आहेत. तर एका रुग्णांवर घरी उपचार करताना बंगाली डॉक्टर.