शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आडूळ परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:04 IST

अंकुश वाघ आडूळ : परिसरात शासकीय आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जात ...

अंकुश वाघ

आडूळ : परिसरात शासकीय आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी पैठण तालुक्यातील आडूळ, आंतरवाली खांडी, रजापूर, घारेगाव, एकतुनी, दाभरूळ, ब्राह्मणगाव, खादगाव, पारुंडी, गेवराई बु. या गावांमध्ये बस्तान मांडले असून गरीब, अशिक्षित नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. तर यासंदर्भात आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने बोगस डॉक्टरांचे फावत चालले आहे.

वैद्यकीय शिक्षणाची नोंदणी अथवा परवाना नसतानासुद्धा बंगाली डॉक्टरांकडून सर्रासपणे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. थंडी तापाचा रुग्ण असल्यास त्याला आरामही पडतो. मात्र गंभीर आजाराचा रुग्ण असल्यास हे डॉक्टर पुढील उपचारासाठी पाठवून देतात. हा व्यवसाय करताना अंगलट येण्यासारखे काही प्रकरण घडल्यास ते बाहेरच्या बाहेर मिटविले जाते. यासाठी बोगस डॉक्टरांकडून स्थानिक पातळीवर राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र, कोणतीच कार्यवाही होत नसल्याने बोगस बंगाली डॉक्टरांचे दवाखाने खेड्यापाड्यात बिनबोभाटपणे सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाची लक्षणे असलेले नागरिक भीतीपोटी शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल न होता बोगस बंगाली डॉक्टरांकडून सध्या उपचार घेत आहेत. काही डॉक्टर तर मोठी रिस्क घेऊन घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले. मात्र यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

समिती नावालाच

आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाते. काही ठिकाणी जिल्ह्यात कारवाई झाली. मात्र, ती कारवाई ठोसपणे होत नसल्याने पुन्हा डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे.

आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्रात आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. बंगाली बोगस डॉक्टर मद्यपान करून रुग्णांवर उपचार करीत असल्याने रुग्णाच्या जीवाशी ते खेळ घालीत आहेत.

- शेख शौकत, आडूळ, ग्रामस्थ.

हा अतिशय गंभीर प्रकार असून तपासणी पथक पाठवून आडूळ परिसरातील बोगस डॉक्टरांवर निश्चित कडक कारवाई केली जाईल.

- डॉ सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

फोटो : आडूळ परिसरात बोगस बंगाली डॉक्टरांचे असे गावात ठिकठिकाणी दवाखाने थाटले आहेत. तर एका रुग्णांवर घरी उपचार करताना बंगाली डॉक्टर.