शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गिरिजा प्रकल्पात बोअरचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:45 IST

सुनील घोडके, खुलताबाद येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांकडून सर्रासपणे बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़

सुनील घोडके,  खुलताबादखुलताबाद शहरासह जवळपास २५ गावांसाठी जलसंजीवनी ठरलेल्या तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांकडून सर्रासपणे बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़ विशेष म्हणजे बोअर घेण्याची परवानगी नाही़ मात्र, याची तमा न बाळगता पाटबंधारे विभागाच्या नाकावर टिच्चून हे शेतकरी प्रकल्पाची चाळणी करीत आहेत़तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर असताना प्रशासन मात्र पाण्याचा साठा सांभाळण्यात अपयशी ठरत आहे. गिरिजा मध्यम प्रकल्पातील संपादित क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांत परिसरातील शेतकऱ्यांनी कुठलीही परवानगी न घेता शेकडो विहिरी व बोअर खोदले आहेत. गिरिजा प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकरी येथे बोअर मारून जमिनीच्या पोटातील पाण्याचा उपसा करीत आहेत. शनिवार (दि़२३) शासकीय सुटी असल्याचे पाहून गिरिजा प्रकल्पात दोन बोअर घेण्यात आले.विशेष म्हणजे प्रकल्प क्षेत्रात विहीर अथवा बोअर घेण्याची कुठलीही परवानगी नाही़ मात्र, तरीही पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाणीटंचाईच्या काळात गिरिजात सर्रास बोअर घेण्यात येत आहेत. गिरिजा मध्यम प्रकल्पातून सध्या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टँकर भरण्यात येत आहेत. प्रकल्पातील अवैधरीत्या घेतलेल्या बोअरमुळे पाणीसाठी संपला. आता कुठून तालुक्याला पाणीपुरवठा होणार हा एक प्रश्नच आहे़ प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यास तयार नाही़ कारवाई होत नसल्याने अनेकांनी या प्रकल्पात बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़ त्यामुळे आगामी काळात तालुक्यावर जलसंकट निर्माण होणार हे निश्चित आहे़