शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉडीबिल्डर’ शहाबाज क्षणार्धात नि:शब्द

By admin | Updated: May 18, 2017 23:16 IST

बीड : सव्वापाच फूट उंची.. धिप्पाड शरीरयष्टी...एकाच वेळी पाच- सहा जणांशी भिडण्याची ताकद; पण धारदार शस्त्रापुढे बॉडीबिल्डर शहाबाज खान क्षणार्धात नि:शब्द झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सव्वापाच फूट उंची.. धिप्पाड शरीरयष्टी...एकाच वेळी पाच- सहा जणांशी भिडण्याची ताकद; पण धारदार शस्त्रापुढे बॉडीबिल्डर शहाबाज खान क्षणार्धात नि:शब्द झाला. संपूर्ण शहराला हादरुन सोडणाऱ्या या घटनेतील मुख्य आरोपी पदवीधर असून बुधवारी रात्रीच तो पोलिसांना शरण आला.शहाबाज दलबीर खान (३२ रा. हाफिजगल्ली, जुना बाजार) हा बालेपीर भागात जीम चालवत असे. जुन्या वादातून त्याची कारंजा परिसरातील भरवस्तीत बुधवारी रात्री साडेआठ वाजता हत्या करण्यात आली. याप्रकरणी शहर ठाण्यात दस्तगीर खान हमीद खान यांच्या फिर्यादीवरुन राजू खान, समद खान, अरबाज उर्फ कालू राजू खान, अफरोज राजू खान, सुमेर समद खान, जुबेर समद खान (सर्व रा. कारंजा परिसर) या सहा जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. जुन्या भांडणातून ही हत्या झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.मयत शहाबाज खान हा बुधवारी रात्री कारंजा परिसरातील एक दुकानात अत्तर खरेदीसाठी आला होता. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शहाबाज याने मागे वळून पाहताच अरबाज उर्फ कालू खानने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. हा वार इतका खोलवर गेला की, शहाबाज जागीच कोसळला. त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून मारेकरी लगेचच पसार झाले. शहाबाज व मारेकऱ्यांचा जुना वाद होता. शहाबाज याने राजू खान याला सहा महिन्यांपूर्वी मारहाण केली होती. हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले या मारहाणीचा राग मनात धरुन राजू खान याचा मुलगा अरबाज उर्फ कालू याने इतरांच्या मदतीने शहाबाज यांना संपविण्याचा कट रचला, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, एवढ्या निर्घृणपणे हत्या झाल्याने घटनेमागे काही वेगळे कारण आहे का? याचे कांगेरे तपासणेही सुरु झाले आहे. शहाबाजची हत्या झाल्याच्या बातमीवर अनेकांचा विश्वासही बसत नव्हता. गुरुवारी सकाळी हत्तीखाना भागातील दर्गाह शाह शमशोद्दीन येथील कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी पोलीस बंदोबस्तात पार पडला. भरवस्तीत घडलेल्या घटनेने शहरातील कायदा- सुव्यवस्था ढासळली असून नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.अरबाज उर्फ कालू खान याला गुरूवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.