शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:03 IST

वैजापूर : शहरातील श्रमीक नगर भागात राहणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शनिवारी नारंगी-सारंगी धरणातील विहिरीच्या पाण्यात मिळून आला. वैभव रणछोडदास ...

वैजापूर : शहरातील श्रमीक नगर भागात राहणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शनिवारी नारंगी-सारंगी धरणातील विहिरीच्या पाण्यात मिळून आला. वैभव रणछोडदास वैष्णव (१९) असे मयत युवकाचे नाव आहे. २८ जुलैपासून तो घरातून निघून गेला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मागील काही दिवसांपासून वैभव नैराश्याच्या गर्तेत होता. त्यामुळ‌ेच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असे नातेवाइकांनी सांगितले; परंतु त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

वैष्णव कुटुंबीय हे मूळ तालुक्यातील जांबरगाव येथील आहे. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका भागवत असत. मागील काही वर्षांपासून ते वैजापूर शहरात दाखल राहत असे. वैभवचे वडील आजारी असल्याने घरीच होते. त्यामुळे वैभव हा शहरातील एका कापड दुकानात काम करून महाविद्यालयीन शिक्षण घेत असे.

मंगळवारी (दि.२७) त्याने कुटुंबियांसोबत रात्री ११ वाजेपर्यंत गप्पा मारल्या. सर्व जण झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर तो कामावर जातो, असे सांगून निघून गेला. तो घरी आलाच नाही. भावाने मित्र व नातेवाइकांकडे शोध घेतला; परंतु त्याचा शोध लागला नाही. घरी वापस येईल, या आशेेवर कुटुंबीय होते; परंतु शनिवारी सकाळी नारंगी सारंगी धरणातील गट नंबर १९ मधील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळ‌ून आला. हा मृतदेह वैभव वैष्णवचा असल्याची ओळख पटली. याप्रकरणी भाऊ संदीप वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

----

घर बांधण्याचे स्वप्न होते उराशी

आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी घर बांधण्याचे स्वप्न वैभव उराशी धरून होता. त्यासाठी तो परिश्रम घेत होता; परंतु कोरोनामु‌ळे लॉकडाऊन लागले. दुकानातील नोकरीदेखील काही दिवसांपासून बंद होती. दादा आपण मिळ‌ून घर बांधू, असे तो मोठा भाऊ संदीपला नेहमी बोलायचा; परंतु परिस्थितीमु‌ळे वैभव नैराश्याच्या गर्तेत आलेला होता.

-----

फोटो सह