शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव धनगर शिवारात युवकाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:04 IST

शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून योगेश राऊत (२२ रा. माळेगाव धनगर) घरातून बेपत्ता झालेला होता. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. ...

शनिवारी सकाळी नऊ वाजेपासून योगेश राऊत (२२ रा. माळेगाव धनगर) घरातून बेपत्ता झालेला होता. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. रविवारी पुन्हा नातेवाईकांनी परिसरात व शेजारील डोंगरात शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान ‘आईचा खोरा’ या नावाने ओळखले जाणाऱ्या डोंगरातील वनविभागाच्या जागेत आप्पाराव बोराडे यांना झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढ‌ळून आला. त्यांनी पोलीस पाटील सूर्यभान तुकाराम राऊत यांना दिली. पोलीस पाटील यांनी पिशोर पोलिसांना याबाबत माहिती दिली. सपोनि बालाजी वैद्य व सहाय्यक फौजदार विजय आहेर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृतदेह हा गावातील युवक योगेश राऊतचा असल्याचे स्पष्ट झाले. चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.

---------------

हत्या की आत्महत्या दिवसभर चर्चा

योगेश राऊत या युवकाचा मृतदेह वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जंगलात आढळून आला. शनिवारपासून अचानक बेपत्ता झालेला योगेश जंगलात कशासाठी गेला असेल, याबाबत चर्चा होऊ लागल्या. योगेशने आत्महत्या की त्याची हत्या झाली असावी, अशी उलटसुलट चर्चा गावात सुरू होती. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली. सपोनि बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय आहेर अधिक तपास करीत आहे. वन विभागाचे वनपाल पी आर परदेशी, वनरक्षक हरिश्चंद्र वाघ आणि वनमजूर सूर्यभान ढाकणे यांची उपस्थिती होती.

फोटो :