शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात अर्धनग्न अवस्थेत सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:03 IST

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत खुनाचे सत्र सुरू असून बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील एस.टी. कॉलनीत एका ...

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत खुनाचे सत्र सुरू असून बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील एस.टी. कॉलनीत एका अनोळखी महिलेचा अर्धनग्न व हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेला मारहाण करून तिचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील एसटी कॉलनीत बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दत्तात्रेय पांढरे यांना अनिल वऱ्हाडे व अतुल राणे यांच्या घरासमोर एक अनोळखी महिला रक्ताचे थारोळ्यात असलेली दिसून आली. या प्रकाराची माहिती त्यांनी घरमालकाला दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा. पोनि. मदनसिंग घुनावत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी त्या अनोळखी महिलेच्या अंगावर असलेली साडी बाजूला काढली असता तिचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले तसेच चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

चेहराही रक्ताने माखलेला

या अनोळखी महिलेस मारेकऱ्यांनी सुरुवातीला मारहाण केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा असून चेहराही रक्ताने माखलेला आहे. तिचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले होते. या महिलेचा खून केल्यानंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकरी जात असताना कुणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने मारेकरी तिचा मृतदेह एसटी कॉलनीत टाकून पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

श्वान पथक घटनास्थळीच घुटमळले

या खुनाची माहिती मिळाल्यानंतर श्वान व फॉरेन्सिकच्या लॅबक्या पथकाने घटनास्थळ गाठून रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. यावेळी श्वान टिपू हा घटनास्थळीच घुटमळल्याने मारेकरी वाहनातून पसार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या प्रसंगी श्वान पथकाचे एम. एम. तनपुरे, ए. व्ही. मोरे, ए. के. महेर आदींची उपस्थिती होती.

महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून नागरिकांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. या भागातील कोण महिला बेपत्ता आहे का, याची विचारपूस केली. कॉलनीतील सर्व घरांमध्ये जाऊन महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने मारेकऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फोटो ओळ - बजाजनगरातील घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस अधिकारी.