शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:40 IST

लिंबेजळगाव : दिघी काळेगाव येथून अपहरण झालेल्या विशाल शांतीलाल गायकवाड या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलिंबेजळगाव : दिघी काळेगाव येथून अपहरण झालेल्या विशाल शांतीलाल गायकवाड या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी एका विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयत मुलाच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने घटनास्थळी गदारोळ झाला. विशाल रविवारी गावाजवळच खळ्यात बैलांना चारा टाकण्यासाठी गेला होता. रात्र झाली तरी विशाल घरी का आला नाही म्हणून आई, वडील व नातेवाईकांनी विशालचा शोध घेतला. परंतु विशाल सापडला नसल्याने सोमवारी वाळूज पोलीस ठाण्यात शांतीलाल गायकवाड यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यावरुन वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत विशालचा शोध सुरु केला. घटनेच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी सकाळी विशालचा मृतदेह विहिरीत आढळून आला.संशयावरुन पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले होते.दिघी -कनकोरी रस्त्यावरील कनकोरी शिवारातील गट नं.९८ मधील नवनाथ रघुनाथ पेहरकर (रा.येसगाव ) या शेतकऱ्याच्या विहिरीत विशालचा मृतदेह आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली.गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. ४ संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर वाळूज पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला व शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे .औरंगाबाद महानगरपालिकेच्या जवानांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक अमीत बागूल, गजानन सोनटक्के, सहायक फौजदार दत्तात्रय साठे, पो.हॅ.कॉ. मच्छींद्र शेळके, गणेश पाटील, शेख व शिल्लेगावचे सहायक पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे, उपनिरीक्षक पी.ए.मुंडे, पो.हॅ.कॉ. विनोद डिघोत आदींनी भेट दिली. सध्या तरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच घटनेचा उलगडा होणार आहे.