शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

पुन्हा आढळले मानवी मृतदेहाचे अवयव

By admin | Updated: May 26, 2015 00:47 IST

नळदुर्ग : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे मानवी कवटी आढळल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी दोघांवर कारवाईही झाली आहे

नळदुर्ग : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे मानवी कवटी आढळल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी दोघांवर कारवाईही झाली आहे. दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव साठवण तलाव क्षेत्रातील शिरगापूर पुलानजीक सोमवारी एका पुरूषाच्या मृतदेहाचे अवयव आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मयत इसमाचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले.बाभळगाव साठवण तलाव क्षेत्रातील या पुलाजवळ अज्ञात इसमाचे प्रेत असल्याची शंका काही नागरिकांनी पोलिसांकडे व्यक्त केली होती. यावरून ईटकळ दूरक्षेत्रमधील हेकॉ एस. जी. शिंदे यांनी तातडीने या ठिकाणी जावून शोधाशोध सुरू केली. यावेळी पुलापासून काही अंतरावर बेशरमाच्या झाडात सडलेल्या अवस्थेत मृतदेहाचे काही अवयव आढळून आले. सदर मृतदेह पाण्यात भिजल्यामुळे पूर्णपणे सडून गेला होता. तसेच श्वापदांनी त्याचे लचके तोडल्याने अनेक अवयव विखुरले गेले होते. यावेळी शर्टाच्या बाहीत पायाच्या हाडाचे सांगाडे असल्याचे दिसले. तसेच नायलॉनच्या दोरीने या इसमाचे दोन्ही पाय बांधून टाकल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे यांना माहिती मिळताच तेही सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर मृताच्या अंगात असलेल्या शर्टवर टेलरचा ट्रेडमार्क तसेच या ठिकाणी एका खाजगी वित्त संस्थेचे आरडी खात्याचे पासबूकही आढळून आले आहे. या पासबूकवरील नोंदी तेलगू भाषेत आहेत. सदर इसमाचा खून करून जवळपास महिन्याभरापूर्वी पाण्यात टाकले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, जवळच्या पोलिस ठाण्यासह आंध्र, कर्नाटकातील ठाण्यांनाही याबाबत माहिती कळविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोउपनि जी. एच. पठाण, हेकॉ शिंदे, पोकॉ वाघमोडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शिरगापूर पुलानजीक आढळून आलेल्या या प्रेताची सध्या कसलीच ओळख पटत नसली तरी शर्टवरील टेलरचा पत्ता, आरडी पासबूक यावरून याचा लवकरच छडा लागेल, असे सपोनि मेंगडे यांनी सांगितले. तसेच घटनास्थळी मिळालेली हाडे न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, वेळ पडल्यास डीएनए चाचणी देखील करू, असेही मेंगडे यांनी सांगितले.