शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोमबत्ता तलावात महिनाभरात नौकाविहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:25 IST

दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात जलविहारासाठी महिनाभरातच दहा नौका अवतरणार आहेत.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे पाऊल पडते पुढे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने याठिकाणी फारसे काही केले नसले, तरी जिल्हा परिषदेने मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेला नौकाविहार प्रकल्पाचा संकल्प आता वास्तवात उतरला आहे. दौलताबादच्या कुशीत असलेल्या मोमबत्ता तलावात जलविहारासाठी महिनाभरातच दहा नौका अवतरणार आहेत.औरंगाबादेतीलच एका रिसोर्ट चालकाला मोमबत्ता तलावात नौकाविहार चालविण्याचे कंत्राट मिळाले असून, जिल्हा परिषदेने यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. असे असले तरी सदरील कंत्राटदार संस्थेकडून जिल्हा परिषदेला पहिल्या वर्षात प्रति महिना ३० हजार रुपये भाडे मिळणार आहे. याशिवाय नौकाविहारासाठी पर्यटकांना दिले जाणारे तिक ीट हे जिल्हा परिषद साक्षांकित करून देणार आहे. वर्षभरात नौकाविहार प्रकल्पाला मिळणाºया उत्पन्नाचा अभ्यास करून पुढे मग सदरील संस्थेकडून भाडे घ्यायचे की उत्पन्नात भागीदारी घ्यायची, याचा निर्णय जिल्हा परिषद घेणार आहे. विशेष म्हणजे, मोमबत्ता तलावातील नौकाविहार प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न हे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत स्वत:च्या विकासकामांना वापरणार नाही, तर त्यातून मोमबत्ता तलाव परिसराचा विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला. समितीने मागील दोन वर्षांपूर्वी या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी सव्वाकोटी रुपयांचा निधीही दिला होता. त्यातील ६२ लाख रुपये खर्चून मोमबत्ता तलावाच्या ठिकाणी बोटिंगतळ, खिडकीघर, कॅन्टीन, वाहनतळ, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी इतर सुविधांचे बांधकाम केले. नौकाविहार चालविण्यास देण्यासाठी जिल्हा परिषदेने चार वेळा ई-निविदा काढल्या. मात्र, एकही सक्षम संस्था पुढे आली नाही. अखेर दोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्च न होऊ शकल्यामुळे निधी शासनाला परत करावा लागला. अनंत अडथळे पार करत जिल्हा परिषदेने मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी त्या संस्थेसोबत पाच वर्षांचा करार पूर्ण केला. सदरील संस्था ८ पॅडल बोटी आणि २ स्पीड बोटी खरेदी करणार आहे. लाईफ गार्ड असतील. सुरक्षेच्या सर्व साधनांनी युक्त नौकाविहार महिनाभराच्या आत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.