शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ अधिकारी लाचेच्या सापळ्यात

By admin | Updated: April 18, 2017 23:37 IST

बीड : लाच स्वीकारताना नवगण राजुरी येथील मंडळ अधिकारी श्रीधर भागवानराव साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

बीड : अवैध वाळू वाहतूक करणारी ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करता ती सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवगण राजुरी येथील मंडळ अधिकारी श्रीधर भागवानराव साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजीनगर ठाण्यानजीक ही कारवाई करण्यात आली.सुनील आजबे (रा. जामखेड जि. अहमदनगर) हे वाळू वाहतूकदार आहेत. त्यांच्या मालकीचा ट्रक वाळू घेऊन सोमवारी नवगण राजुरी मार्गे अहमदनगरला जात होता. राजुरी शिवारात मंडळ अधिकारी श्रीधर साळुंके यांनी हा ट्रक पकडून तहसील कार्यालयात जमा केला. ट्रक सोडण्यासाठी साळुंके यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. आजबे यांनी त्यांना १० हजार रुपये दिलेही होते. उर्वरित दहा हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले होते. दरम्यान, अवैध वाळू वाहतुकीची ट्रक चालवायची असेल तर प्रतिमाह दहा हजार रुपये हफ्ता द्यावा लागेल, अशी मागणी साळुंके यांनी ट्रकमालक आजबेंकडे केली होती. आजबे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, गजानन वाघ, पोहेकॉ श्रीराम खटावकर, विकास मुुंडे, अमोल बागलाने, प्रदीप वीर, राकेश ठाकूर आदींनी शिवाजीनगर ठाण्याजवळ सापळा लावला. पाच हजार रुपये स्वीकारताच साळुंके यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईने महसूल वर्र्र्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)