शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

बंबसाहेब विकासाची ब्ल्यू प्रिंट कुठंय?

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

लालखाँ पठाण, गंगापूर बंबसाहेब आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातली विकास कामे दाखवा, तालुका विकासाची ब्ल्यू प्रिंट कुठंय, असे खडे सवाल करून जनतेने आ. बंब यांना आमसभेत भंडावून सोडले.

लालखाँ पठाण, गंगापूरबंबसाहेब आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातली विकास कामे दाखवा, तालुका विकासाची ब्ल्यू प्रिंट कुठंय, असे खडे सवाल करून जनतेने आ. बंब यांना आमसभेत भंडावून सोडले. जनतेचे फोन घेत जा असा अधिकाऱ्यांना आमसभेत दम भरणाऱ्या बंब यांनाही लोकांनी तोच प्रश्न विचारल्याने अडचणीत आलेल्या आमदारांनी दिवसभर चालणारी आमसभा दोन तासांतच गुंडाळली.गेल्या पाच वर्षांत कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचा ठराव, आतापर्यंत फार्सच ठरला. प्रत्यक्षात कुणावरही कारवाई झालीच नाही. प्रत्येक आमसभेत विचारले गेलेले प्रश्न सुटलेच नाहीत. आ. बंब यांचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याचे आमसभेत दिसून आले. ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे कागदोपत्री उद्दिष्टपूूर्ती दाखविण्याचे काम अधिकारी वर्गाने बजावल्याचे जाणवले. गंगापूर तालुक्याचा विकास आराखडा (ब्ल्यू प्रिंट) कागदोपत्रीच आहे. प्रत्यक्षात तालुक्यात मैलाचा दगड ठरेल, असे कामच झाले नाही. त्यामुळे जनता पुन्हा ‘नव्या भिडूचा’चा शोध घेईल. मागील निवडणुकीत जनतेने याच मानसिकतेतून गंगापूर तालुक्याला आ. बंब यांच्या रुपाने नवा चेहरा दिला. पण जनतेचा भ्रमनिरास झाला. निवडणूक काळात दिलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या. बंब यांना तालुक्याच्या जनतेचा विसर पडला की काय, हे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसते. ते नेहमीच मतदारसंघाबाहेरील प्रश्नावर बोलताना दिसतात. ते गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार की जिल्ह्याचे, हा प्रश्न जनतेला पडला आहे. आपल्या राहत्या गावातच वर्षानुवर्षे तहानेने व्याकूळ झालेल्या जनतेसाठी अगोदर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी शहरातील जनतेचा पाणी प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटू लागला आहे. प्रश्नांचा भडिमार...आमसभेत नेहमीच विकास कामांबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांबाबत जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या बंब यांना आमसभेत अ‍ॅड. महेंद्र राऊत यांनी प्रश्नांचा भडीमार करून निरुत्तर केले. साहेब, तुमच्या मागील निवडणुकीचा नारा ‘चला लढू या, बदल घडवू या’ यानुसार काय बदल घडविला, स्पष्ट करा, म्हटल्यावर बंब गोंधळून गेले. तोच दुसरा प्रश्न तुम्ही फोन न उचलण्याचे व गंगापूर संपर्क कार्यालयात हजर न राहण्याचे कारण काय? अधुरी पडलेली विकास कामे होणार कधी? आदी प्रश्नांचा भडीमार होत असतानाच मी सतत मिटिंगमध्ये असतो. विधानसभेत असतो. आमसभेत असतो, असा बचाव केला. पण विविध स्तरांतील प्रश्नांचा भडीमार वाढत गेल्याने शेवटी दोनच तासांत आमसभा आटोपती घेऊन बंब निघून गेले.