शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सबसिडीचे निळे रॉकेल हळूहळू बंद होणार

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

औरंगाबाद : सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या निळ्या रॉकेलचा कोटा शासनाने कमी केला आहे.

औरंगाबाद : सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या निळ्या रॉकेलचा कोटा शासनाने कमी केला आहे. आता पेट्रोल-डिझेलप्रमाणे पांढऱ्या रंगाचे रॉकेल बाजारात खुल्या मार्केट रेटनुसार उपलब्ध करून देण्याचा घाट शासनाने घातला आहे. हे रॉकेल विक्रीसाठी घाऊक, किरकोळ परवाने देण्यासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सबसिडीचे निळे रॉकेल हळूहळू बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरुवातीला सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रेशन दुकानांमार्फ त कार्डधारकांना रॉकेल पुरवठा होत असे. त्यानंतर गॅस सिलिंडर आल्याने रॉकेलचा कोटा हळूहळू कमी होत गेला. रॉकेलचा कोटा ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे. सध्या फक्त पिवळ्या कार्डधारकांसाठीच रॉकेल दिले जाते. गॅस उपलब्ध होत असल्याने रॉकेलची ओरड कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाने पांढरे रॉकेल खुल्या बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी ‘समांतर केरोसीन बाजार योजना’ असे नाव देण्यात आले आहे. बीपीसी, एचपीसी, आयओसी या कंपन्यांमार्फत संबंधित घाऊक वितरकांना रॉकेलचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी पांढऱ्या रॉकेलचा व्यवसाय करण्यासाठी वितरकांना तीनपैकी एका कंपनीशी करार करावा लागणार आहे. केंद्र शासनाच्या परराष्ट्र धोरणाचाच हा एक भाग असून, भारताबाहेर पांढऱ्या रॉकेलचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र, तिकडे या रॉकेलला मागणी नाही. त्यामुळे हा साठा भारतात विकण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.