शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगर भागात तरुणाचा खून

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

जालना : येथील संभाजीनगर भागातील पाटील गल्लीत प्रमोद एकनाथ माने (३६) यांचा खून करण्यात आला.

जालना : येथील संभाजीनगर भागातील पाटील गल्लीत प्रमोद एकनाथ माने (३६) यांचा खून करण्यात आला. ही घटना ९ जूनच्या पहाटे ४.२१ ते ६ वाजेच्या सुमारास घडल्याचा संशय सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पी.के. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले. याप्रकरणी मयताचा भाऊ राजेंद्र एकनाथ माने (४०) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खुनाच्या घटनेनंतर सदर बाजार पोलिस ठाण्यात जमावाने गर्दी केली होती. येथील बालाजी मंदिराजवळ पाटील गल्लीत ही घटना घडली. आरोपींनी प्रमोदला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्याला राहत्या घरासमोर आणून टाकले. त्याच्या डोक्याला, छातीला जबर मार लागला. सुरूवातील पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात नातेवाईकांना सांगितले होते. ही नोंदही पोलिसांनी घेतली होती. दरम्यान, छावा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांना ठासून सांगितले. त्यानंतर सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. परिसरातील काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद माने हा अनेकवेळा रस्त्याने पैसे मोजत जात असे. त्यामुळे पैसे काढून घेण्यासाठी कोणीतरी त्याला मारहाण केली असावी, असा संशय व्यक्त केला. मात्र कुलकर्णी यांनी सांगितले, प्रमोद माने यांच्या वागणुकीविषयी परिसरातील एकाही व्यक्तीची तक्रार नाही. कोणाशी त्याचा जास्त संबंधही येत नव्हता. मात्र महिना-दीड महिन्यापूर्वी पत्नी निघून गेल्याने तो त्रासलेला होता. त्याला दारू पिण्याची सवय होती. त्यानंतरही तो कोणाशीही बोलत नव्हता. ८ जूनच्या रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत तो सारखा गच्चीवरून खाली येत होता, खालून पुन्हा वर येत होता. हा प्रकार तीन ते चार वेळा केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. यावरून तो बेचैन होता, असा अंदाज आम्ही बांधल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाले, आपण रात्रीच्या गस्तीवर याच भागात होतो. आपण रात्रीपासून पहाटे ४.२१ वाजेपर्यंत गस्ती टाकली. शेवटची गस्तही ४.२१ वाजता मारली. त्यावेळी या भागात आपणास काहीच आढळून आले नाही. सकाळी ६ वाजेच्या सुमारास लोकांना प्रमोद माने हे जखमी अवस्थेत दिसले. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घातपात आणि अपघात याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून तपासाद्वारे आणखी काही माहिती बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)