शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने वार करून तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: November 14, 2016 00:31 IST

बीड : शहरातील सय्यदअली नगर भागात जुन्या भांडणातून शेख अजमोद्दीन शेख रहिमोद्दीन (वय २५) याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली.

बीड : शहरातील सय्यदअली नगर भागात जुन्या भांडणातून शेख अजमोद्दीन शेख रहिमोद्दीन (वय २५) याची तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली. या हल्ल्यात अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सय्यदअली नगर भागात मयत शेख अजमोद्दीन हा आपल्या घरासमोर उभा होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन तरूणांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. त्याच्या पोटात खोलवर जखम झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी आलेल्या गुलाब शहाबुद्दीन व रियाज शहाबुद्दीन यांच्यावरही तलवारीने हल्ला करण्यात आला. यात हे दोघेही जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.दरम्यान, शेख अजमोद्दीन याला परिसरातील तरूणांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या घटनेनंतर अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश गावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सय्यदअली नगर भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. काही वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी ही गर्दी पांगवली. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करीत शेख मुस्तफा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शेख अजमोद्दीन याचे काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. हा वाद गल्लीतील तरूणांनी आपापसात मिटवला होता. मात्र, रविवारी अजमोद्दीन याच्यावर अचानक हल्ला झाला. जुन्या भांडणातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)