लोकमत न्यूज नेटवर्कबिडकीन : गायरान जमिनीच्या वादातून पारधी समाजाच्या महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या रांजणगाव शिवारात घडली. झालाबाई सोपान काळे (५०, रा. बाजारतळ बिडकीन) असे मृत महिलेचे नाव आहे.झालाबाई शनिवारी सकाळी गट नं. १२६ मधील गायरान जमिनीवरील शेतात गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला, पण त्या सापडल्या नाही. रविवारी सायंकाळी रांजणगाव येथील पोलीस पाटलांना रांजणगावशिवारात मोसंबीच्या शेतात एका महिलेचा मृतदेह असल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना ही माहिती कळविली.बिडकीनचे सपोनि. पंडीत सोनवणे, सहायक फौजदार आईटवार, बलभीम राऊत, जमादार प्रकाश शिंदे, बाळासाहेब लोणे, दिलीप चौरे, पोलीस कर्मचारी दीपक देशमुख, सुग्रीव घुगे, सुनील सुरासे, तोडकर यांनी घटनास्थळ गाठून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. सदर मृतदेह झालाबाईचाच असल्याची खात्री झाल्याने विलास सोपान काळे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. खून झाल्यानंतर फाशी देऊन झालाबाईला मारल्याचे निष्पन्न झाले.
गायरान जमिनीच्या वादातून महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:36 IST