शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

एका ‘क्लिक’वर मिळणार रक्तसाठ्याची माहिती !

By admin | Updated: December 30, 2016 00:00 IST

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेने आता कात टाकली आहे!

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेने आता कात टाकली आहे! ही ब्लड बँक थेट इंटरनेटशी जोडली गेली असून, एका क्लिकवर या ‘ई- ब्लड बँकेतील’ स्टॉकसह इतर माहिती उपलब्ध होणार आहे़ वर्षाखेरीस सुरू झालेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गरजू नागरिकांना मोठी मदत मिळणार आहे़ विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेला ई- बल्ड बँकेचे स्वरूप देण्याचा हा राज्यातील पहिला उपक्रम आहे़उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात १९८९ साली रक्तपेढी सुरू झाली़ या रक्तपेढीतून जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियांसाठी, अपघातातील जखमींसह इतर गरजू रुग्णांना रक्तचा पुरवठा करण्यात येऊ लागला़ त्यानंतर आॅगस्ट २०१३ मध्ये या रक्तपेढीत रक्त घटल विलगीकरण कें्रद्रास प्रारंभ झाला़ तर जीवन अमृत सेवेंतर्गत जानेवारी २०१४ पासून रक्ताचा पुरवठा करण्यास प्रारंभ झाला़ असले असले तरी रक्तविलगीकरण केंद्रासाठी असलेल्या तांत्रिक अडचणी, रिक्तपदे विशेषत: वेळोवेळी कमी प्रमाणात असणाऱ्या रक्ताच्या बॅगा हा प्रश्न मोठा गंभीर होत होता़ मध्यंतरीच्या काळात ब्लड बँकेतील रक्तसाठा वाढविण्यासाठी चांगले प्रयत्न झाले आहेत़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांच्या संकल्पनेतून ‘ई- ब्लड बँक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़ संगणकीय प्रणालीने रक्त संकलन, रक्त चाचणी, रक्तसाठा व रक्तपुरवठा या रक्तपेढीतील मुख्य कार्यप्रणालीचे याद्वारे नियोजन करण्यात आले़ या ई- ब्लड बँकेत रक्तपेढीलतील सर्व माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाली असून, रक्तसाठ्यातील पारदर्शकता अधिक वाढली आहे़ जिल्ह्यातीलच व जिल्ह्याच्या जवळील एखाद्या नागरिकांना रक्तपेढीलतील माहिती घ्यावयाची असल्यास ती ई हॉस्पिटल डॉट गर्व्ह डॉट इन आॅब्लीक ब्लड बँक या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून शकतो़ रक्तसंक्रमण अधिकारी डॉ़ भास्कर साबळे, डॉ़ अश्विनी गोरे, टेलीमेडिसीन मधील किरण बारकूल आदी अधिकारी, कर्मचारी ही ‘ई- ब्लड बँक’ अपडेट ठेवण्यासाठी नवी दिल्ली येथील एआयसी मार्फत ही ‘ई- ब्लड बँक’ सुरू करण्यात आली आहे़ जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेतील कर्मचारी उपलब्ध माहिती, स्टॉक, प्लेटलेट, प्लाझमा, पीसीव्ही आदींची माहिती बँकेत भरत आहेत़ विशेषत: वेळोवेळी जिल्ह्यात होणारे शिबीर, शिबिरात संकिलित होणारा रक्तसाठा, रक्तदाते, त्यांचे वय, ब्लडग्रूप, मोबाईल नंबर, पत्ता आदी संपूर्ण माहिती आता या ब्लड बँकेत संकलित होणार आहे़ (प्रतिनिधी)