शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन मंडळाने जि.प.चा कोट्यवधीचा निधी ठेवला अडवून

By admin | Updated: December 11, 2014 00:40 IST

संजय कुलकर्णी , जालना संपूर्ण जि ल्हा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा नियोजन व विकास मंडळाने जिल्हा परिषदेसाठी २०१४-१५ अंतर्गत मंजूर केलेला ४६ कोटींपैकी ३४ कोटींचा निधी चालू

संजय कुलकर्णी , जालनासंपूर्ण जि ल्हा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा नियोजन व विकास मंडळाने जिल्हा परिषदेसाठी २०१४-१५ अंतर्गत मंजूर केलेला ४६ कोटींपैकी ३४ कोटींचा निधी चालूआर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीनंतरही बीडीएस (निधी वितरण प्रणाली) वर टाकला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हातपंप दुरूस्ती किंवा आरोग्य केंद्रांसाठी औषधींची खरेदी करणेही दुरापास्त झाले आहे. मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला दरवर्षी जिल्हा नियोजन व विकास मंडळाला शासनाकडून मंजूर होणाऱ्या एकूण निधीपैकी सुमारे ७० टक्के निधी दिला जातो. २०१२ मध्ये राज्यात भयावह दुष्काळी परिस्थितीत जालना जिल्हा अग्रेसर होता. २०१३ मध्ये समाधानकारक पाऊस झाला असला तरी २०१४ मध्ये मात्र पावसाचे प्रमाण अल्प आहे. परिणामी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात असताना जिल्हा नियोजन मंडळाने मात्र जिल्हा परिषदेला चालू आर्थिक वर्षात मंजूर केलेला व उपलब्ध असलेला निधीही पूर्णपणे देऊ केलेला नाही. २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा परिषदेला ४६.३९ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी केवळ ११.४८ कोटींचा निधी बीडीएसवर टाकला. आरोग्य, सिंचन आणि पशुसंवर्धन या प्रमुख तीन विभागांसाठी एक रूपयादेखील दिलेला नाही. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी केवळ १५ लाखांचा निधी दिला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातपंप नादुरूस्त आहेत. तर काही ठिकाणी नवीन हातपंपांची गरज आहे. आरोग्य केंद्रांमध्येही औषधींची गरज आहे. मात्र बीडीएसवर निधी जमा न झाल्याने जिल्हा परिषदेला हातपंप दुरूस्ती किंवा त्यासाठीचे सुटे भाग खरेदी करता येत नाही. औषधींचा पुरवठा करण्याचे आदेशही संबंधित कंपनीला अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही जिल्हा परिषदेला कृत्रिम निधी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत जिल्हा नियोजन व विकास अधिकारी रवींद्र जगताप म्हणाले की, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने २०१३-१४ या आर्थिक वर्षात केलेल्या खर्चाची विभागनिहाय माहिती तपशीलवारपणे दिलेली नाही. त्यांनी ती दिल्यास मंजूर निधी तात्काळ बीडीएसवर टाकण्यात येईल.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जी.बी. चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषदेला मंजूर असलेला निधी बीडीएसवर उपलब्ध व्हावा, यासाठी आम्ही नियोजन व विकास मंडळाकडे पाठपुरावा करीत आहोत. निधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेतील विविध विभागांची काही कामे रखडल्याचे चव्हाण यांनी मान्य केले.