शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अंध विद्यार्थ्यांनी केला शिक्षणात अहमदपूर पॅटर्न

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

राम तत्तापूरे, अहमदपूर अहमदपूरमध्ये दहावीच्या चार अंध विद्यार्थ्यांनी डोसळांनाही लाजवेल, अशी गुणवत्ता धारण करून शिक्षणातही अहमदपूर पॅटर्न निर्माण केल्यामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे़

राम तत्तापूरे, अहमदपूरशिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अहमदपूर शहरामध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अग्रेसर राहिलेल्या दहावीच्या चार अंध विद्यार्थ्यांनी डोसळांनाही लाजवेल, अशी गुणवत्ता धारण करून शिक्षणातही अहमदपूर पॅटर्न निर्माण केल्यामुळे या चार अंध विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे़महाराष्ट्राच्या नकाशावर अहमदपूरचा शैक्षणिक पॅटर्न गाजत आहे़ त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत यशवंत विद्यालयातील सृष्टी करकनाळे ही विद्यार्थिनी ९९ टक्के गुण घेऊन अव्वल राहिली. तसेच अहमदपूर शहरातील इतर शाळांचेही निकाल चांगले लागले आहेत़ हडोळती जिल्हा परिषद शाळेतील अंध विद्यार्थिनी क्रांती दिलीप हेंगणे हिने ७९ टक्के गुण घेत जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला़ क्रांती शंभर टक्के दृष्टिहीन आहे. तिचे वडील शेतात काबाडकष्ट करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात़ त्यांना इतर दोन मुली असून त्यांचे लग्न झाले आहे़ परंतु क्रांती मात्र जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली़ अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयातील सांगवी सुनेगाव येथील नसीमा उमरसाब सय्यद या अंध विद्यार्थिनीने ६२ टक्के गुण घेऊन यश संपादन केले़ तिच्या इतर तीन्ही बहिणी अंध असून त्या विवाहित आहेत, तर एक भाऊ आहे़ वडील मोलमजुरी करून उदनिर्वाह करतात़ शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील मोहिनी बाबूराव गुरमे या अंध विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले़ मोहिनीचे वडील शेती करत असून, त्यांना एक भाऊ व दोन बहिणी आहेत़ यामध्ये एक महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे़ अहमदपूर तालुक्यातील सोनखेड, मानखेड येथील नूतन जनता विद्यालयातील शंकर किसन मोरे या अंध विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले़ त्याला दोन भाऊ, दोन बहिणी असून, त्यातील एका बहिणीचे लग्न झाले आहे़ शंकरचे वडील मनोरूग्ण असून, त्याने स्वत:च्या गुणवत्तेसाठी खाजगी शिकवणी लावून गुणवत्तेत भरारी घेतली़ कॅसेट श्रवणयंत्र व लेखनिकाच्या माध्यमातून त्याने तयारी केली़ या अंध विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम़डी़मोरे, प्राचार्य रेखा तरडे, डी़एऩसाळवे, बाबूराव वाघमारे, चंद्रकांत मोघे, उमाकांत सेवणकर, दिगंबर डिकळे, हणमंत बाशिंगे यांचेही मार्गदर्शन लाभले़ विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अहमदपूर शहर व परिसरातून कौतुक केले जात आहे़ अहमदपूर तालुक्यातील या अंध गुणवंतांनी देदिप्यमान यश मिळविल्याबद्दल अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, गणेश हाके, सरपंच शिवाजी भिकाणे, गटविकास अधिकारी नितीन दाताळ, गटशिक्षणाधिकारी एल़एम़डुरे आदींच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला़अहमदपूर शहरातून इयत्ता दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मदत करावी, असे आवाहन केले़