बीड : प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेऊन पे्रयसीने गुपचूप ब्ल्यू फिल्म बनविली. त्या आधारे प्रियकरास दहा लाखांची खंडणी मागितली. सदरील रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारताना उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे पाटील व त्यांच्या पथकाने त्या महिलेस शहरातील सोमेश्वर नगर येथील तिच्या राहत्या घरात रविवारी दुपारी रंगेहाथ पकडले.बार्शी नाका पुलाजवळील सोमेश्वर नगर भागात ३० वर्षीय महिला भाड्याच्या घरात काही महिन्यांपासून रहात आहे. त्या महिलेचे शहरातीलच एका ३२ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. या तरुणाचा दुचाकी गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्याकडे व्यवहारातील पैसे असायचे. दरम्यान, सहा महिन्यात महिलेचे संबंध त्याच्यासोबत वाढले. काही दिवसापूर्वी त्या महिलेने त्यास घरी बोलाविले व अनैतिक संबंध प्रस्थापित केले. घरामध्ये पूर्वीच सेट केलेल्या एका कॅमेऱ्यातून संबंधाची रेकॉर्डींग केली. याची माहिती त्या तरुणास नव्हती. त्यानंतर त्या महिलेने त्या तरुणाच्या मोबाईलवर रेकॉर्डींगमधील काही फोटो पाठविले. दहा लाख रुपये दे, अन्यथा तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करील. तसेच हे फोटो व क्लिप कुटूंबियांना दाखवून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तरुण करणार होता आत्महत्याती महिला त्या तरुणाकडे दहा लाख रुपयांची वारंवार मागणी करत होती. पैशांची पूर्तता कशी करावी?, कुटूंबियांना माहिती मिळाली तर काय होईल?, आदी प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाले होते. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्याने निश्चित केले. आत्महत्या करण्यास निघाला असता त्याच्या मित्राने त्याला अडवून थेट पोलिसांकडे नेले. उपअधीक्षक गणेश गावडे पाटील यांनी त्या तरुणास धीर देत सर्व प्रकरण समजावून घेतले. नाव गुप्त ठेवण्याच्या आश्वासनानंतर कारवाई गतिमान झाली. (प्रतिनिधी)तरुणास ब्ल्यू फिल्मद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिच्याकडे बीड शहरातील प्रतिष्ठित लोकांच्या नावाची मोबाईल क्रमांकासह यादीच होती.४त्यांच्या सोबतही असा काही प्रकार झालाय का ? याची माहिती पोलीस घेत आहेत. ४सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यापाऱ्यांनाही त्या महिलेने असेच ब्लॅकमेल केले आहे. त्यांची तक्रार असल्यास कारवाई होणार असल्याचे समजते.सदरील महिलेस त्या तरुणाने पैसे देणार असल्याचे सांगितल्याने तिने रविवारी सकाळी घरी बोलाविले. घरात गेल्यानंतर त्या तरुणाने त्या महिलेस ५० हजार रुपये दिले. तेवढ्यात उपअधीक्षक गावडे पाटील व त्यांचे पथक घरात गेले. त्यावेळी महिलेच्या हातात ५० हजार रुपये होते. पोलीस पहाताच त्या महिलेने पैसे लगेचच फेकून दिले. या सर्व प्रकाराची व्हिडीओ शुटींग पोलिसांनी केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या महिलेच्या घराची झाडाझडती घेतली असता एक मेमरी कार्ड आढळून आले. त्यात महिलेने पैसे मागितल्याचा पुरावा आहे. तसेच घरातील दोन मोबाईल ही जप्त केले आहेत. या कारवाईत सहायक निरीक्षक संजीव राऊत, फौजदार स्वाती लांबखेडे, पो. काँ. मनीषा चाटे, हंबर्डे, गंगावणे यांचा सहभाग होता.
‘ब्ल्यू फिल्म’द्वारे ब्लॅकमेलिंग
By admin | Updated: May 25, 2015 00:30 IST