शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

‘भाजपचे सरकार आता युवकच खाली खेचतील’- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:51 IST

‘ज्या युवकांनी भाजपला सत्तेवर बसवले तेच युवक आता हे सरकार खाली खेचतील. ६ कोटी युवकांना नोक-या देण्याचे आश्वासन पाळणे तर दूरच, पण त्यांना पकोडा तळण्याचा सल्ला देऊन हे सरकार त्यांची क्रूर चेष्टा करीत आहे. हे सहन न करण्यापलीकडचे असून, युवकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष खदखदतोय’अशी संतप्त प्रतिक्रिया आज येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांची अमित शहा पकोडा सेंटरला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘ज्या युवकांनी भाजपला सत्तेवर बसवले तेच युवक आता हे सरकार खाली खेचतील. ६ कोटी युवकांना नोक-या देण्याचे आश्वासन पाळणे तर दूरच, पण त्यांना पकोडा तळण्याचा सल्ला देऊन हे सरकार त्यांची क्रूर चेष्टा करीत आहे. हे सहन न करण्यापलीकडचे असून, युवकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष खदखदतोय’अशी संतप्त प्रतिक्रिया आज येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.सिडकोतील विनोद पाटील यांच्या घरासमोर गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेल्या राष्टÑवादी युवक काँग्रेसच्या उपहासात्मक अमित शहा पकोडा सेंटरला भेट देऊन व तेथील काही पकोडे खाऊन झाल्यानंतर मुंडे हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी पकोडेही तळले. यावेळी युवकांनी आर्टस् पकोडा- २० रु., सायन्स पकोडा- २० रु., इंजिनिआर पकोडा - २० रु. असे फलक झळकवले होते. तसेच बँडपथक ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे आळवत होते. ‘या थापाड्या सरकारचं करायचं काय..... खाली मुंडकं वर पाय’, ‘नरेंद्र मोदी-अमित शहा काय सांगतात.....बेरोजगारांनो पकोडे तळून पोट भरा म्हणतात’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.या देशात फक्त एकाच युवकाला रोजगार मिळाला. तो म्हणजे अमित शहा यांचा मुलगा जय शहा. त्याचा धंदा मात्र कैकपटींनी वाढला. मोदी-शहा यांना युवकांची ही थट्टा महागात पडेल, असा इशाराही मुंडे यांनी दिला. प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले की, बीडमध्ये जयदत्तअण्णा क्षीरसागर हे भाजपला मदत करीत आहेत.विनोद पाटील, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, विनोद बनकर, शेख असिफ वसी मणियार, बलदेव बोंबले, कैलास कुंटे, बाळासाहेब औताडे, रहिम पटेल, धीरज पाटील, विकास श्ंिदे, अक्षय शिंदे, गजानन पाटील, मयूर सोनवणे, श्रीकांत बोराडे, संदीप कानडे, विकास ठाले, रवींद्र काळे, मयूर कुºहाडे, शुभम गाडेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले.राणेंची चेष्टा महाराष्टÑ पाहतोय...नारायण राणे यांचा स्वाभिमान आता भाजपने कितपत ठेवलाय... उभा महाराष्ट्र नारायण राणे यांची भाजपने चालवलेली चेष्टा पाहतोय, असे यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्यादिवशी राणे यांनी काँग्रेस सोडली, त्या क्षणाला त्यांना मंत्रीपद द्यायला हवं होतं. पण आता त्यांना सडवलं जातंय.औरंगाबादला राणे यांची आज सभा होती. यासंदर्भात मुंडे यांनी सांगितले की, आता सामान्य माणसांवर अशा सभांचा काहीच परिणाम होणार नाही.