शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची भूमिका ठरणार निर्णायक !

By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून, राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून, राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील महापौर पदाच्या निवडीसंदर्भातील तिढा सुटल्याने आता जिल्ह्यातील प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हालचालींना सुरूवात केली असून, जिल्हा परिषदेच्या सत्तेचा कौल भाजपाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने चित्र आहे. यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख चारही पक्षांनी स्वबळावर लढली. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आली असून, त्यांच्याकडे २६ सदस्य आहेत. तर सत्ताधारी असलेल्या शिवसेना, काँग्रेसची या निवडणुकीत पिछेहाट झाली असून, शिवसेनेकडे तेरा, तर काँग्रेसकडे अकरा सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द करण्यासाठी २८ सदस्यांची आवश्यकता असल्याने राष्ट्रवादीला आणखी दोन तर सेना-काँग्रेसला चार सदस्यांची आवश्यकता आहे. यावेळी प्रथमच जिल्हा परिषद स्वबळावर लढलेल्या भाजपाच्या जागा यंदा दुप्पट झाल्या असल्या तरी त्यांच्या हातीही केवळ चार सदस्य आहेत. मात्र, भाजपाचे हे चार सदस्यच जिल्हा परिषदेतील सत्तेचा कौल ठरविण्यासाठी आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीनेही हालचाली सुरू केल्या आहेत. एक अपक्ष सदस्य निवडून आला असला तरी बहुमत गाठण्यासाठी इतर पक्षाची मदत घेणे अपरिहार्य असल्याने राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी भाजपाचीच मदत घ्यावी लागेल. तशीच परिस्थिती शिवसेना-काँग्रेसची आहे. २४ सदस्यबळ असलेल्या शिवसेना-काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी चार सदस्यांची आवश्यकता असून, भाजपाने शिवसेना-काँग्रेसच्या बाजुने भूमिका घेतल्यास ते सत्तेत येवू शकतात. अशा परिस्थितीत भाजपाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालेले आहे. २१ मार्च रोजी विशेष सभा असल्याने सत्तेचे नेमके गणित तेव्हाच स्पष्ट होणार आहे.