शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

भाजपाचा बार, राष्ट्रवादी गार !

By admin | Updated: October 20, 2014 00:34 IST

प्रताप नलावडे , बीड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त करीत सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवित भाजपाने विजयश्री खेचून आणण्याची किमया केली.

प्रताप नलावडे , बीडराष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त करीत सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवित भाजपाने विजयश्री खेचून आणण्याची किमया केली. बहुरंगी निवडणूक असे म्हटले जात असले तरी विजयासाठीची झुंज राष्ट्रवादी आणि भाजपामध्येच झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांचा या निवडणुकीत पार धुव्वा उडला. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यामुळे मतांचे झालेले विभाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभुतीचा फायदा, मोदी यांच्या सभेनंतर तयार झालेले वातावरण, मतदारांची नाराजी आणि जातीची समिकरणे असे अनेक मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरले. परळी मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. बीड मतदारसंघातील एकमेव जागा राष्ट्रवादीला राखता आली. भाजपाचे विनायक मेटे यांनी रा.कॉ.चे जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर तगडे आव्हान ठेवले होते. क्षीरसागर यांची प्रचाराची आणि संपर्काची पध्दतशीर यंत्रणा, त्यांची स्वत:ची जनमानसातील चांगली प्रतिमा आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांची असलेली ओळख अशा अनेक बाबी त्यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. पहिल्या फेरीपासूनच मेटे आणि क्षीरसागर यांच्यातील कडवी झुंज शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्कंठा वाढविणारी ठरली. पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये मेटे आघाडीवर राहिले मात्र त्यानंतर दहाव्या फेरीपासून क्षीरसागारांनी घेतलेली मतांची आघाडी वाढतच राहिली. अटीतटीच्या सामन्यात क्षीरसागर यांनी ६ हजार १३२ मताधिक्य मिळवित मेटेनां अस्मान दाखविले.आष्टीत रा.कॉ.चे सुरेश धस आणि भाजपाचे भीमराव धोेंडे यांच्यात असाच अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या फेरीपासून सुरेश धस यांनी मतांची आघाडी घेतली, परंतु १८ व्या फेरीत धोंडे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर कधी धोंडे पुढे तर कधी धस पुढे अशी स्पर्धा शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. धोंडे यांनी ५ हजार ९८२ इतक्या मतांचा धक्का धस यांना देत विजयश्री अक्षरश: खेचली. गेवराईत पंडितांच्या एकछत्र अमल मोडीत काढत बदामराव पंडित यांना भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी ६० हजारांचे मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळविला. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवित भाजपाच्या आर.टी. देशमुख यांनी विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर राहिले. केजमध्ये संगीता ठोंबरे यांनीही पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. परळीतही पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी आघाडी कायम ठेवत २६ हजार मतांनी अपेक्षित विजय मिळविला.