शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या निविदांसाठी भाजप मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:44 IST

प्रशासनाकडून निविदा काढण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याने भाजप पदाधिकारी मेटाकुटीला आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिकेला १०० कोटींच्या निधीत रस्त्यांच्या ४ निविदा काढण्यास मान्यता दिली. त्यानंतरही शुक्रवारी महापालिका प्रशासनाने दिवसभर भाजपच्या पदाधिका-यांना निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत झुलवत ठेवले. महापालिका कार्यालय बंद करण्याची वेळ आली तरी निविदा प्रसिद्ध केल्याच नाहीत. प्रशासनाकडून निविदा काढण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याने भाजप पदाधिकारी मेटाकुटीला आले आहेत.१०० कोटींच्या निविदा प्रक्रियेचा प्रवास मागील तीन महिन्यांपासून अत्यंत गमतीशीर आहे. महापालिकेतील या नाट्यमय ‘घडामोडी’ पाहून शासनालाही आता आश्चर्य वाटायला लागले आहे. प्रत्येक किरकोळ बाबीसाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने महापालिकेला स्पष्ट शब्दात १०० कोटींमध्ये चार निविदा काढण्यास मान्यता दिली. शासन मान्यतेला उलटून २४ तास झाले, तरी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या नाहीत. निविदांसाठी शुक्रवारी सकाळी आयुक्त खास दिल्लीहून दाखल झाले. दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आणि आयुक्तांच्या बंगल्यावर बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू होते. महापौर बापू घडमोडे, सभापती गजानन बारवाल आजच निविदा प्रसिद्ध करा, असा आग्रह धरून होते. प्रशासनाकडून सकाळी सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला. सायंकाळपर्यंत निविदा प्रसिद्ध होतील असा कयास पदाधिकाºयांनी बांधला. सूर्य मावळतीला येताच पदाधिकाºयांची चलबिचल वाढली. निविदा का निघाल्या नाहीत, अशी विचारणा सुरू झाली. शनिवार ते सोमवारपर्यंत सलग तीन दिवस सुट्या आहेत. सुट्यांमध्ये निविदा काढता येते किंवा नाही, यावर खल सुरू झाला. शेवटी काही शासकीय अधिका-यांचे अभिप्राय माजी सभापती दिलीप थोरात यांनी घेतले. सुट्टीत निविदा काढता येऊ शकते असे अधिकाºयांनी नमूद केले. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने निविदा प्रसिद्धीसाठी ई-टेंडरला दिल्या नाहीत.