शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यालयाचे सेना आमदारांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:47 IST

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला लढत देण्याची हवा निर्माण करणाºया भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीत काँग्रेसला लढत देण्याची हवा निर्माण करणाºया भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख यांनी मात्र पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाचा नारळ आपणच फोडल्याचे सांगितले आहे.नवीन नांदेडातील ओम गार्डन येथे भाजपाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी आयोजित केला होता. उद्घाटक म्हणून शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती तर यावेळी भाजपाचे शहर महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, चैतन्य देशमुख, डॉ. अजित गोपछडे, भगवानराव आलेगावकर, दिलीपसिंग सोडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर झालेल्या सभेत पक्षाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आ. चिखलीकरांच्या रुपाने भाजपाला मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रतापाने महापालिकेवर आमचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चैतन्यबापू देशमुख यांनी यावेळी महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. आ.चिखलीकर म्हणाले, जनतेचे काम करताना आपण कोणत्या पक्षात आहोत हे महत्त्वाचे नसते. आपण किती प्रश्न सोडवतो, याला महत्त्व आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये आपण काम केल्याचे सांगताना पक्ष वाढवण्याचे काम सातत्याने केल्याचेही ते म्हणाले. रामराव केंद्रे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमास बालाजी गिरगावकर, दिलीप ठाकूर, संतोष वर्मा, सुरेंद्र घोडजकर, शीतल खांडिल, विजय गंभीरे, मनोज जाधव, विपुल मोळके, धनराज मंत्री, महिला आघाडीच्या धनश्री देव, डॉ. शीतल भालके, अरुंधती पुरंदरे, महादेवी मठपती आदींची उपस्थिती होती.भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सेनेचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते केल्याबाबत प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. देशमुख यांना विचारले असता कार्यालयाच्या उद्घाटनाचे नारळ आपल्याच हस्ते फोडल्याचे ते म्हणाले.