शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या प्रत्येक मृत्युस यापुढे भाजपच सर्वस्वी जवाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : देशभरातील २२ राज्यांमध्ये ३९ मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रांमुळे उद्यापासून होणाऱ्या कोरोनाच्या प्रत्येक मृत्यूस भारतीय ...

औरंगाबाद : देशभरातील २२ राज्यांमध्ये ३९ मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रांमुळे उद्यापासून होणाऱ्या कोरोनाच्या प्रत्येक मृत्यूस भारतीय जनता पक्षच सर्वस्वी जबाबदार राहील, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते, माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी पत्रपरिषदेत केला.

ते म्हणाले, कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवत जनआशीर्वाद यात्रांचा हा प्रकार हास्यास्पद नव्हे तर मूर्खपणाचा आहे. कोरोना अद्याप संपलेला नसताना या यात्रांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्स पाळले जात नाहीत. शाळा बंद, मंदिरे बंद. रेल्वे आता कुठे चालू झाल्या. याचे त्यांना काहीच वाटत नाही. तुम्ही किती इनडिफरन्ट आहात. जनतेच्या भवितव्याशी त्यांना काही देणे-घेणे दिसत नाही. शेवटी माणसे जगली पाहिजेत, हा विचारच यांच्याकडे दिसत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने काही नियम केले आहेत. विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत, याकडे लक्ष वेधून गायकवाड म्हणाले, देशात विक्रमी बेकारी आहे. दोन कोटी लोकांना नोकरी देऊ असे सांगत होते. उलट लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कुटुंबच्या कुटुंबे उदध्वस्त झाली. राजकीय स्वार्थासाठी भाजपची मंडळी मिरवणुका काढत आहेत. मोठी गर्दी जमवताहेत, हे निषेधार्ह आहे. यांच्या जनआशीर्वाद यात्रा रोखण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. पण, गर्दी करणार नसल्याचे गायकवाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेससह सारेच राजकीय पक्ष कोरोनाचे नियम पाळत नाहीत. मग तेही जबाबदार नाहीत का, असे विचारले असता गायकवाड उत्तरले, पण सर्वस्वी जवाबदार भाजपच राहील. या पत्रपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे, सूरजितसिंग खुंगर, रवी माहोरकर आदींची उपस्थिती होती.