शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

जाफराबादमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी-शिवसेना पडले फिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:33 IST

तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली.

प्रकाश मिरगेजाफराबाद : तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली. एवढेच नव्हे तर तो आमचाच उमेदवार म्हणत अनेकांनी सेल्फी काढत दावा सुरू केला आहे.तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात लढत झाली. त्यामुळे शिवसेना तालुका अध्यक्ष बजरंग बोरसे यांनी राष्ट्रवादीने जिंकलेल्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही सोबत मिळून लढविल्या असून, त्यात आमचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार राजकारण करत इतर पक्षाचा टेकू घेत निवडणुका लढवून जिंकल्या असल्याने ते सगळीकडेच हात ठेवून आहेत. एक मात्र नक्की भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ घेतसुद्धा अपेक्षित यश मिळालेले नाही. काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असल्याने एका गटाला भाजपचे अधिकृत असताना पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरपंच पद एक आणि दावे अनेक असे चित्र रंगले.खासगाव ग्रामपंचायतीमध्ये संतोष लोखंडे यांनी तालुक्यातून विक्रमी मताने निवडून येण्याचा बहुमान मिळविला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच घुमजाव केल्याने येथे राष्ट्रवादीने पक्षाचा विश्वासघात केला असल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे गावात राष्ट्रवादीचे काम मोठे हा नुसता गवगवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ठिकाणी एकतर्फी निवडणुक झाली.प्रतिष्ठतेच्या समजल्या जाणाºया खासगाव आणि काळेगाव या ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य लिलाबाई लोखंडे व शालीकराम म्हस्के यांनी बहुमताने ताब्यात ठेवल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान कृषी सभापती जिजाबाई कळंबे यांची गारखेडा-टाकली ग्रामपंचायत भाजपाने ताब्यात घेतली.भाजपाने चापणेर- धोंडखेडा, येवता, आसई, खासगाव, सवासनी, नळविहरा, मेरखेडा, सावरगाव म्हस्के, काळेगाव,डावरगाव देवी, गारखेडा-टाकळी, खानापूर-वरखेडा फिरंगी या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने चापणेर-धोंडखेडा, येवता, माहोरा, आसई, घानखेडा, नळविहरा, डावरगाव देवी, तर शिवसेनेने रास्तळ वानखेडा यावर दावा सांगितला आहे. पंधरा ग्रामपंचायतीत नवीन सरपंच आणि त्यांचे सदस्य निवडून आल आहेत, असे असले तरी सगळ्यांनी मिळून दावा वीसचा केला आहे. त्यामुळे खरे चित्र काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे. खानापूर ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाली आहे.--------------------ग्रामपंचायत निहाय सरंपच पुढील प्रमाणेखासगाव- संतोष रामराव लोखंडे,मेरखेडा- श्रीकृष्णा शालीकराम जाधव,घानखेडा- सरस्वती राजू बोराडे,रास्तळ- वानखेडा- शिवगंगा संतोष जाधव,नळविहीरा- मिनाबाई रमेश गाडेकर,सवासणी- रेखा समाधान गाडेकर,आसई- अनिता विलास इंगळे,माहोरा- वैशाली रविद्र कासोद,येवता- अवचितराव महादु दळवीकाळेगाव- अन्नपुर्णा वसंतराव चव्हाण,सावरगाव म्हस्के- दिनकर देवराव म्हस्केगारखेडा-टाकळी - मनिषा गजानन कळंबे,डावरगाव देवी- अनिल बळीराम नवलेचापनेर- धोंडखेडा - लताबाई विक्रम साळेकर,खानापूर-वरखेडा फिरंगी- पंचफुला देविदास शेळके