शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:03 IST

परभणी : निवडणुकीच्या काळात भाजपाने खोटी आश्वासने दिली़ शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता बैठकीत बोलताना केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निवडणुकीच्या काळात भाजपाने खोटी आश्वासने दिली़ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत बोलताना केला़राष्ट्रवादीच्या वतीने पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाचे नेते जिल्हा दौऱ्यावर आले होते़ यानिमित्त शहरातील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली़ यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते़ व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ चित्रा वाघ, जिल्हा प्रभारी प्रकाश सोळंके, आ़ विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, जि़ प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आ़ रामराव वडकुते, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, स्वराजसिंह परिहार आदींची उपस्थिती होती़ अजित पवार म्हणाले, भाजपाने निवडणुकीत खोटी आश्वासने दिली़ डिझेल, पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत आहे़ शेतमालाला भाव दिला जात नाही़ कर्जमाफीबाबत शब्दांचा खेळ केला जात आहे़ परभणी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात एक तरी नवा उद्योग या सरकारने आणला आहे़, असा सवाल करून ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावून पक्षाचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत़ जिल्हा परिषदेत पक्ष सत्तेत असल्याने लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, परभणी महानगरपालिकेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी़ पक्षांतर्गत मतभेद असतील तर आपसात बसून मिटवावेत किंवा पक्षश्रेष्ठींसमोर मांडावेत़ प्रसार माध्यमांपर्यंत पोहचून हे मतभेद चव्हाट्यावर आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले़ पदाधिकाऱ्यांनीही निर्णय घेताना कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावी, असे सांगून अजित पवार यांनी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पक्षसंघटनाबाबत घेतलेल्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले़ यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागावे़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाकाजाचा दर दोन-तीन महिन्याला आढावा घेतला जाईल़, पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे़ दरम्यान, दिवसभर पक्षाच्या विविध सेलची तसेच तालुकानिहाय पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली़ तसेच अजीत पवार व सुनील तटकरे यांनी वैयक्तीकरित्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही चर्चा केली़ सायंकाळी परभणी शहरातील नगरसेवकांची बैठक झाली़ या बैठकीत काही नगरसेवकांनी महापौर पदासाठी पक्षाने निवडलेल्या अपक्ष उमेदवाराविषयी व मनपातील गटनेत्याविषयी तक्रारी केल्या़ तसेच विश्वासात घेऊन संबंधितांची निवड केली नसल्याचे सांगितले़ आ़ दुर्राणी यांनी मात्र पक्ष हितासाठीच निर्णय घेतला असल्याचे सांगितले़