शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेनेला हादरा

By admin | Updated: March 3, 2017 01:31 IST

लातूर : बसस्थानकामागील अंबिका देवी मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा बेकायदेशीर ठराव केल्याप्रकरणी लातूर मनपाच्या तत्कालीन स्थायी समितीच्या १६ सदस्यांना राज्य शासनाने नोटिसा बजावल्या आहेत़

लातूर : बसस्थानकामागील अंबिका देवी मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाचा बेकायदेशीर ठराव केल्याप्रकरणी लातूर मनपाच्या तत्कालीन स्थायी समितीच्या १६ सदस्यांना राज्य शासनाने नोटिसा बजावल्या आहेत़ ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा शासनाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आरपीआयच्या तत्कालीन स्थायीतील १६ नगरसेवकांना हादरा दिला़ राज्य शासनाकडून नोटिसा अद्याप संबंधित नगरसेवकांना मिळाल्या नसल्या तरी अपात्रतेचे संकट त्यांच्यावर आहे़ बसस्थानकाच्या पाठीमागील अंबिका देवी मंदिरासमोर कायम स्वरूपी सभामंडप उभारण्यासाठी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती पप्पू देशमुख व समितीतील अन्य १५ सदस्यांनी ठराव घेवून सहमती दिली़ याबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुधीर धुत्तेकर यांनी स्थायी समितीने अतिक्रमणाला मदत केली असल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली़ या तक्रारीची गंभीर दखल घेऊन शासनाने मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़ आयुक्तांचा अहवाल गेल्यानंतर नगर विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनी तत्कालीन स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांच्यासह अन्य १५ सदस्यांना महानगरपालिका अधिनियम कलम १० (ड) प्रमाणे नोटिसा बजावल्या आहेत़ आपले नगरसेवक पद रद्द करून निवडणुकीला ६ वर्षे अपात्र का करू नये, अशा नोटिसा पाठविल्या आहेत़ ७ दिवसात खुलासा करण्याचे निर्देशही या नोटिसीत देण्यात आले आहेत़ यामुळे तत्कालीन स्थायी समितीतील सभापती पप्पू देशमुख, रविशंकर जाधव, रविकुमार जाधव, डॉ़ विजय अजणीकर, कविता वाडेकर, सुरेखा इगे, श्रीमती मिस्त्री, उषाताई कांबळे, महादेव बरूरे, राष्ट्रवादीचे राजा मनियार, इर्शाद तांबोळी, शैलेश स्वामी, आशा स्वामी, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे आदींचे सदस्यत्व धोक्यात आले आहे़