लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप महाराष्टÑात शिवसेनेसोबत युती करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. स्वबळावर राज्यात लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपने आतापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून, गुरुवारी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री तथा पक्षाचे महासचिव महेंद्रसिंग शहरात दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते आढावा घेणार आहेत.मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत सेनेचे खासदार निवडून आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे. ही वस्तुस्थिती क्षणभर मान्य केली तरी औरंगाबादेत १९९९ पासून चंद्रकांत खैरे सतत निवडून येत आहेत. चार वेळा ते खासदार झाले आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये खैरे कोणत्या लाटेवर निवडून आले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपने सशक्त उमेदवार दिल्यास तो निवडून येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपचे स्थानिक नेते खैरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास खाजगीत नकार देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदारांना एका लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा आदेश दिला आहे. भाजपच्या आमदारांनाही दुसºया भागात जाऊन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सांगितले आहे.
भाजपकडूनही लोकसभेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:24 IST