शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

सा. बां.तर्फे कोट्यवधींची कामे

By admin | Updated: December 22, 2014 00:08 IST

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुमारे १३ कोटी रुपयांची ही कामे करण्यात येणार आहेत.औरंगाबाद-अजिंठा-बऱ्हाणपूर या रस्त्याच्या दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. ३ कोटी ६ लाख आणि २ कोटी ६३ लाख रुपये या रस्त्यांच्या डांबरीकरणावर खर्च करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे देवगाव ते गंगापूर या रस्त्याच्या कामावरही १ कोटी ४२ लाख रुपये, औरंगाबाद तालुक्यातील पळशी ते अंजनडोह या अंतर्गत रस्त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या कामावर २ कोटी १९ लाख रुपये खर्च होतील. मकबरा ते औरंगाबाद लेण्यापर्यंतच्या रस्त्याची अवस्थाही मागील काही वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली आहे. यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी निविदा काढली होती. मात्र, कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याने काम तसेच रखडले होते. या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, १ कोटी ९० लाख रुपये या कामावर खर्च होतील. औराळा ते लक्ष्मीदेवी संस्थानपर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. या कामावर ३५ लाख २१ हजार रुपये खर्च होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन कामांचा डिसेंबर अखेर धडाका लावला आहे. मात्र, मागील अर्धवट कामांचा या विभागाला विसर पडला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ज्या कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत, त्यांना आजपर्यंत बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नवीन कामे घेण्यास कंत्राटदारही इच्छुक नाहीत. कामे केल्यानंतरही दोन वर्षे बिले निघत नसतील तर कशासाठी कामे करायची, असा मुद्या कंत्राटदारांनी उपस्थित केला आहे.वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात एका अधिकाऱ्याच्या मनमानीला कंत्राटदार लॉबी वैतागली होती. अधिकारी सतत सुट्टीवरच असतात. त्यामुळे भेटावे तरी कोणाला, असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे.