शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

विकासदिन म्हणून विलासराव देशमुख यांची जयंती साजरी

By admin | Updated: May 27, 2014 00:57 IST

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती लातूर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवारी ‘विकास दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती लातूर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवारी ‘विकास दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. बाभळगाव येथील त्यांच्या समाधीस्थळी प्रार्थना सभाही झाली. देशमुख कुटुंबियांसह कार्यकर्त्यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. समाधीस्थळी विलासराव देशमुख यांच्या आठवणी कार्यकर्त्यांना दाटून आल्या. आपल्या प्रदीर्घ राजकीय कालखंडात त्यांनी सामान्य माणूस व मागास भागाचा विकास साधला. प्रार्थनासभेतही त्यांची उणीव प्रत्येकांच्या चेहर्‍यांवर जाणवत होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. त्यानंतर माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई देशमुख, आमदार अमित देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, काकासाहेब पाटील सास्तूरकर, नाथसिंह देशमुख यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, आमदार वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आ. चंद्रशेखर भोसले, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. धनाजीराव साठे, विवेक जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस.आर. देशमुख, मांजरा कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख, जगदीश बावणे, ‘रेणा’चे यशवंत पाटील, आबासाहेब पाटील, विजय देशमुख, संतोष देशमुख, अ‍ॅड. त्रिंबक भिसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस भवन येथेही आदरांजली वाहण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. समद पटेल यांनी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विकास कारखान्याने जलसंधारणाच्या कामाने आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी) मित्राच्या जयंतीदिनी मित्राला मिळाले मित्राचेच खाते... विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री महाराष्ट्राला परिचित आहे. दोघे जीवाभावाचे मित्र. आज योगायोग. दिवंगत विलासरावांचा जन्मदिन. तिकडे दिल्लीत गोपीनाथ मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी आजच लागली. विशेष म्हणजे विलासराव देशमुख यांनी प्रभावीपणे सांभाळलेले ग्रामविकास मंत्रालय आता गोपीनाथ मुंडेंकडे आले आहे. विलासरावांच्या जन्मदिनी त्यांनीच हाताळलेले ग्रामविकास मंत्रालय मुंडेंना मिळाले. मित्राच्या जन्मदिनी मित्राने हाताळलेले मंत्रालय मिळाल्याची चर्चा दोघांच्याही कार्र्यकर्त्यांत सोमवारी लातुरात ऐकायला मिळाली.